ETV Bharat / state

ऑक्सिजनबाबत साताऱ्यातील रुग्णालय आत्मनिर्भर! - ऑक्सिजन यंत्रणे बद्दल बातमी

ऑक्सिजनबाबत साताऱ्यातील रुग्णालय आत्मनिर्भर बनले आहे. या रूग्णालयाचे नाव यशवंत असून त्यांनी हवेतून ऑक्सिजन गोळा करून तो रुग्णांना पुरवणारा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उभारला आहे.

सातारा
ऑक्सिजनबाबत साताऱ्यातील रुग्णालय आत्मनिर्भर!
author img

By

Published : Apr 23, 2021, 3:52 PM IST

Updated : Apr 24, 2021, 9:25 PM IST

सातारा - राज्यासह सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना साताऱ्यातील एक रूग्णालय मात्र आत्मनिर्भर बनले आहे. हे रूग्णालय तेथील रुग्णांना रोज लागणारा ऑक्सिजन स्वतः तयार करते. त्यामुळे ऑक्सिजनसाठीची धावपळ थांबली आहे.

प्रतिक्रिया

153 जंबो सिलेंडरची क्षमता -

यशवंत रूग्णालय त्या रुग्णालयाचे नाव! राधिका रस्त्यावर बसप्पा पेठेत हे रुग्णालय आहे. हवेतून ऑक्सिजन गोळा करून तो रुग्णांना पुरवणारा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उभारण्यात आला आहे. दिवसाला 153 जम्बो सिलेंडर किंवा मिनिटाला 250 लिटर ऑक्सिजन तयार केला जातो. या मशीनमुळे व्हेंटिलेटरवरचे सहा तर ऑक्सिजनवरच्या वीस ते पंचवीस रुग्णांना हा ऑक्सिजन 24 तास पुरतो.

अन् परावलंबित्व झाले दूर -

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उभारण्याची गरज सांगताना या हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनिल पाटील म्हणाले, कोविडच्या पहिल्या लाटेत, साधारण सप्टेंबर महिन्यात रुग्ण संख्या मोठी असताना ऑक्सिजनचा ड्युरा मिळत नव्हता. मध्यरात्री तासंतास रूग्णालयाच्या गेटवर गाडीची वाट बघावी लागायची. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्हीं ऑक्सिजन वितरण व्यवस्थेवर अवलंबून न राहता कॉन्सन्ट्रेटर उभारण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यात ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेवरील आमचे परावलंबित्व दूर झाले.

इतरांसाठी अनुकरणीय -

हवेत 21 टक्के ऑक्सिजन असतो. त्या हवे मधूनच ऑक्सिजन वेगळा करून 95 ते 99 टक्के ऑक्सिजन तयार केला जातो. तोच रुग्णांना पुरवला जातो. या यंत्रणेमुळे आमची दैनंदिन गरज भागली. 20 ते 25पेक्षा जास्त बेड क्षमता असलेल्या रूग्णालयांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपल्याकडे उभारावा, असे डॉ. पाटील यांनी सुचवले.

खर्चात मोठी बचत -

यामागील आर्थिक बाजू स्पष्ट करताना डॉ. पाटील म्हणाले, "पूर्ण क्षमतेने याचा वापर झाल्यास 100 युनिट प्रतिदिन दराने महिन्याला 40 हजार रुपये वीजबिल येते; जे या काळात वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनवरील खर्चाच्या तुलनेत (एक ते सव्वा लाख प्रतिमहा) खर्चात मोठी बचत करणारे आहे. दोन ते अडीच वर्षांत या यंत्रणेवरील गुंतवणूकही भरून निघते. सर्व मध्यम व मोठ्या रुग्णालय व्यवस्थापनाने तात्कालिक विचार न करता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसून स्वयंपूर्ण व्हावे."

स्वयंपूर्णतेचे समाधान -

आमचा स्वतःचा प्लांट असल्यामुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांची एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होणारी तारांबळ थांबली. तसेच आम्हांलाही रुग्णांच्या उपचारावर लक्ष केंद्रित करता आले. आज इतरत्र ऑक्सिजनचा तुटवडा असताना आम्ही याबाबत स्वयंपूर्ण आहोत याचे वेगळे समाधान असल्याचे डॉ. शुभांगी पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. तो खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्याचे काम यशवंत हॉस्पिटलने केले आहे, अशा भावना भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा - अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल; काय आहे प्रकरण?

Last Updated : Apr 24, 2021, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.