ETV Bharat / state

साताऱ्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

मृत गणेशचा रंगकामाचा व्यवसाय होता. फुटक्या तळ्याजवळ एका इमारतीच्या रंगरंगोटीचे काम घेतले होते. इमारतीच्या एका बाजूस वॉटरप्रुफिंगचे काम करण्यासाठी स्लॅबवर दोरीच्या सहाय्याने झोला बांधून तो ५ व्या मजल्यापर्यंत आला होता.

satara
साताऱ्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू
author img

By

Published : Dec 10, 2019, 4:22 PM IST

सातारा - इमारतीचे वॉटर प्रुफिंगचे काम सुरू असताना ५ व्या मजल्यावरून पडून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील फुटक्या तळ्याजवळ घडली. गणेश सुरेश ढाणे ( वय ३१) असे मृत तरुणाचे नाव असून तो पाडळी गावचा रहिवासी आहे.

हेही वाचा - कांदा साठवणुकीचे नियम आणखी कडक; किरकोळ विक्रेत्यांकरता 'हा' नवा नियम लागू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेशचा रंगकामाचा व्यवसाय होता. फुटक्या तळ्याजवळ एका इमारतीच्या रंगरंगोटीचे काम घेतले होते. इमारतीच्या एका बाजूस वॉटरप्रुफिंगचे काम करण्यासाठी स्लॅबवर दोरीच्या सहाय्याने झोला बांधून तो ५ व्या मजल्यापर्यंत आला होता. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झोल्याचा दोर तुटल्याने तो जमिनीवर कोसळला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तातडीने क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Intro:सातारा : वाॅटरप्रुफिंगचे काम करत असताना झोल्याचा दोर तुटून ५ व्या मजल्यावरुन पडल्याने तरुण कामगाराचा मृत्यू झाला.
गणेश सुरेश ढाणे ( वय ३१, रा. पाडळी, ता. सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
त्याचा रंगकामाचा व्यवसाय होता.Body:घटनास्थळावरुन मिळालेल्या तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटक्यातळ्याजवळ एका इमारतीचे रंगकाम त्याने घेतले होते. इमारतीच्या एका बाजूस वाॅटरप्रुफिंगचे काम करण्यासाठी स्लॅबवर झोला लावून तो ५ व्या मजल्यापर्यंत आला होता. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास झोल्याचा दोर तुटल्याने तो जमिनीवर कोसळला.
या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला.
त्याला क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात हलवण्यात आले. तत्पुर्वी त्याचा मृत्यू झाला होता.

-------------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.