ETV Bharat / state

मंगल जेधे खून प्रकरण : साक्षीदाराने ओळखली विषारी 'इंजेक्शन'ची बाटली अन् 'बॅग'

author img

By

Published : Jan 18, 2020, 8:13 PM IST

वाई येथील धोम हत्यांकाडातील माफीच्या साक्षीदाराने खुनावेळी वापरण्यात आलेले इंजेक्शन, विषारी औषधाची बाटली तसेच मंगल यांच्याकडील बॅग न्यायालयात ओळखली.

आरोपी डॉ. पोळ
आरोपी डॉ. पोळ

सातारा - संपूर्ण महाराष्ट्राला व देशाला हादरवणार्‍या वाई येथील धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून शुक्रवारी (दि. 18 जाने.) ते न्यायालयात उपस्थित होते. यावेळी पोळ याने मंगल यांचा खून करण्यासाठी वापरलेले इंजेक्शन, विषारी औषधाची बाटली, तसेच मंगल यांच्याकडील बॅग न्यायालयात ओळखली.

वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी डॉ. संतोष पोळ याने माझ्यासमोर मंगल जेधे यांना इंजेक्शन दिल्यानंतर त्या तडफडून मेल्याची माहिती दिली. मंगल जेधेंचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. पोळ याने आनंद व्यक्त करून त्यांच्या अंगावरील सोने व रोकड लुटली, अशी साक्षही तिने दिली. दरम्यान, पोळच्या सांगण्यावरून आपणच मंगल यांना पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही तिने यावेळी सांगितले.

हेही वाचा - राजाला पुरावा मागितलाच तर त्यांनी तो द्यावा - लक्ष्मण माने

शुक्रवारी माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष देताना ज्योती म्हणाली, दि.16 जून, 2016 ला संतोषने मंगल यांच्या खुनाची योजना मला सांगितली होती. त्यासाठी सोने दुप्पट करून देतो, असे मंगल यांना त्याने सांगितले होते. मंगल यांना त्यांच्या मुलीच्या बाळंतपणासाठी पुण्याला जायचे असल्याने त्यांनी त्यांच्याकडील सर्व सोने व रोख रक्कम दीड लाख रुपये सोबत घेतले होते. पोळच्या सांगण्यावरून मी 16 जून रोजी पहाटे मंगल यांना माझ्या दुचाकीवरून पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणले होते. त्यानंतर लांबचा प्रवास करायचा असल्याने थकवा न येण्यासाठी इंजेक्शन देतो, असे सांगून पोळने त्याच्याकडील विषारी इंजेक्शन जेधेंना दिले. त्यानंतर त्या तडफडू लागल्यानंतर मी व पोळने त्यांचे हातपाय पकडून धरले व त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोने व त्यांच्या बॅगमधील रोख रक्कम दीड लाख रुपये काढून घेतले.

हेही वाचा - शेखर सिंह साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी

त्यानंतर मंगल या जिवंत आहेत तसेच त्या पोळकडील सोने लुटून गायब झाल्याचे भासवण्यासाठी पोळनेच त्यांचा मोबाईल माझ्याकडे दिला व पुण्याला जाण्यास सांगितले. तसेच पुण्यात गेल्यानंतर मंगल यांचा मोबाईल सुरू करून कोणाचा फोन आला तर तो घ्यायचा पण काहीही बोलायचे नाही, असेही पोळने सांगितले होते. त्यानुसार ज्योतीने पुण्यात गेल्यानंतर मंगल यांचा फोन सुरू केला व त्यावर फोन आल्यावर पोळने सांगितल्याप्रमाणे बोलली नाही. त्यावेळी पोळचाही फोन आला आणि त्याने ‘मॅडम तुम्ही माझे सगळे काही घेऊन गेला आहात, प्लिज माझा फोन घ्या’ असे म्हणू लागला. त्यानंतर पोळने दुपारी तीन वाजता ज्योतीला फोन करून वाईला बोलवून घेतले.

दि. 30 जून, 2016 ला पोळच्या सांगण्यावरूनच ज्योती तिच्या वडिलांना घेऊन कोल्हापूरला गेली. तिथे पोळने लिहून दिलेली एक चिठ्ठी वडिलांना वाचण्यास सांगितले, त्यावर ‘तुझे पोलीस ठाणे मे जाने की इतनी क्या जल्दी थी,’ असे लिहले होते. त्यानंतर पोळचा फोन आल्यावर ज्योतीच्या वडिलांनी चिठ्ठीवरील मजकुर वाचून फोनवर सांगितला. तो कॉल रेर्कार्ड करून पोळने मंगल यांचे अपहरण झाल्याचा बनाव केल्याचे ज्योतीने न्यायालयात सांगितले.

या खटल्याची पुढील सुनावणी दि. 14 फेब्रुवारीला होणार आहे. यावेळी सरकार पक्षावतीने उर्वरीत साक्ष होणार असून त्यानंतर बचाव पक्षाच्यावतीने उलट तपासणी होणार आहे.

Intro:सातारा
संपूर्ण महाराष्ट्राला व देशाला हादरवणार्‍या वाई-धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन.एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून शुक्रवारी ते न्यायालयात उपस्थित होते. यावेळी पोळ याने मंगला यांचा खून करण्यासाठी वापरलेले इंजेक्शन, विषारी औषधाची बाटली, तसेच मंगल यांच्याकडील बॅग न्यायालयात ओळखली आहे.

Body:वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी डॉ. संतोष पोळ याने माझ्यासमोर मंगला जेधे यांना इंजेक्शन दिल्यानंतर त्या तडफडून मेल्याची माहिती दिली. मंगल जेधेंचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. पोळ याने आनंद व्यक्त करून त्यांच्या अंगावरील सोने व रोकड लुटली, अशी साक्षही तिने दिली. दरम्यान, पोळच्या सांगण्यावरून आपणच मंगला यांना पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही तिने यावेळी सांगितले.

काल माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची साक्ष झाली. साक्ष देताना ज्योती म्हणाली, दि.16 जून 2016 रोजी संतोषने मंगल यांच्या खूनचा प्लॅन मला सांगितला होता. त्यासाठी सोने दुप्पट करून देतो असे मंगल यांना त्याने सांगितले होते. मंगल यांना त्यांच्या मुलीच्या बाळंतपणासाठी पुण्याला जायचे असल्याने त्यांनी त्यांच्याकडील सर्व सोने व रोख रक्कम दीड लाख रुपये सोबत घेतले होते. पोळच्या सांगण्यावरून मी 16 रोजी पहाटे मंगला यांना माझ्या दुचाकीवरून पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणले होते. त्यानंतर लांबचा प्रवास करायचा असल्याने थकवा न येण्यासाठी इंजेक्शन देतो, असे सांगून पोळने त्याच्याकडील विषारी इंजेक्शन जेधेंना दिले. त्यानंतर त्या तडफडू लागल्यानंतर मी व पोळने त्यांचे हातपाय पकडून धरले व त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोने व त्यांच्या बॅगमधील रोख रक्कम दीड लाख रुपये काढून घेतले.

त्यानंतर मंगला या जिवंत आहेत तसेच त्या पोळकडील सोने लुटून गायब झाल्याचे भासवण्यासाठी पोळनेच त्यांचा मोबाईल माझ्याकडे दिला व पुण्याला जाण्यास सांगितले. तसेच पुण्यात गेल्यानंतर मंगला यांचा मोबाईल सुरू करून कोणाचा फोन आला तर तो घ्यायचा पण काहीही बोलायचे नाही असेही पोळने सांगितले होते. त्यानुसार ज्योतीने पुण्यात गेल्यानंतर मंगल यांचा फोन सुरू केला व त्यावर फोन आल्यावर पोळने सांगितल्याप्रमाणे बोलली नाही. त्यावेळी पोळचाही फोन आला आणि त्याने ‘मॅडम तुम्ही माझे सगळे काही घेउन गेला आहात, प्लिज माझा फोन घ्या’ असे म्हणून लागला. त्यानंतर पोळने दुपारी तीन वाजता ज्योतीला फोन करून वाईला बोलवून घेतले.

Conclusion:दि.30 जून 2016 रोजी पोळच्या सांगण्यावरूनच ज्योती तिच्या वडिलांना घेऊन कोल्हापूरला गेली. तिथे पोळने लिहून दिलेली एक चिठ्ठी वडिलांना वाचण्यास सांगितले, त्यावर ‘तुझे पोलीस ठाणे मे जाने की इतनी क्या जल्दी थी,’ असे लिहले होते. त्यानंतर पोळचा फोन आल्यावर ज्योतीच्या वडिलांनी चिठ्ठीवरील मजकुर वाचून फोनवर सांगितला. तो कॉल रेर्कार्ड करून पोळने मंगला यांचे अपहरण झाल्याचा बनाव केल्याचे ज्योतीने न्यायालयात सांगितले आहे. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी दि. 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी सरकार पक्षावतीने उर्वरीत साक्ष होणार असून त्यानंतर बचाव पक्षाच्यावतीने उलट तपासणी होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.