ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 ; परदेशी शिष्टमंडळावरुन ओमर अब्दुलांची सरकारवर टीका - JK Assembly Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

JK Assembly Election 2024 : आज जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. या मतदानाच्या निरीक्षणासाठी सरकारनं परदेशी निरीक्षक पाठवले आहेत. त्यावरुन माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

JK Assembly Election 2024
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (ETV Bharat)

श्रीनगर JK Assembly Election 2024: जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्याला आज सकाळी सुरुवात झाली. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये शांततेत मतदान सुरू आहे. मात्र जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मतदानाची निरीक्षण करण्यासाठी आलेल्या परदेशी शिष्टमंडळावरुन माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सरकारवर निशाणा साधला. परदेशी शिष्टमंडळांना आता निवडणुकीचं निरीक्षण करण्यास का आणण्यात आलं, असा सवाल ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केला. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली.

विधानसभा निवडणुकीत परदेशी शिष्टमंडळ करणार निरीक्षण : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. सरकार परदेशी पत्रकारांनी जम्मू काश्मीरवर काही लिहिल्यास मनाई करते. मग मतदान ही देशाची अंतर्गत बाब असताना निवडणुकांचं निरीक्षण करण्यासाठी परदेशी निरीक्षकांना इथं का पाठवलं जात आहे, असा सवाल त्यांनी केला. ओमरा अब्दुल्ला यांनी श्रीनगर मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं.

लोक निवडणुकीवर खूश आहेत, भाजपावर नाही : यावेळी बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले, की "मला समजत नाही हे परदेशी नागरिक जम्मू-काश्मीरवर टिप्पणी करतात, तेव्हा भाजपा त्यांनी कोणतीही टिप्पणी करू नये, असं सांगते. जम्मू-काश्मीर आमचा अंतर्गत विषय आहे, इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असं त्यांना ठणकावलं जाते. मात्र आता परदेशी निरीक्षक का आणले आहेत, असं ओमर अब्दुला यांनी यावेळी सांगितंल. "जम्मू-काश्मीरमधील नागरिक निवडणुकीवर खूश आहेत, असा भास करण्यासाठी या परदेशी निरीक्षकांना पाठवलं जात आहे. मात्र जम्मू काश्मीरचे नागरिक निवडणुकीवर खूश आहेत, ते भाजपा सरकारवर खूश नाहीत. भाजपा सरकारच्या विरोधात मतदान करण्यासाठी नागरिक अपार दु:खांना तोंड देत आहेत, असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले.

हेही वाचा :

  1. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक 2024 Phase 2; मतदानाला सुरुवात, परदेशी शिष्टमंडळ देणार भेट, भाजापा नेत्यांचा 'हा' दावा - JK ASSEMBLY ELECTIONS 2024
  2. दशकभरानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका, 11 वाजेपर्यंत 26.72 टक्के मतदान - Jammu Kashmir Assembly Election
  3. जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक, राज्यातील केवळ 'या' नेत्याचा समावेश - congress 40 star campaigners

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.