ETV Bharat / state

महिला दिन विशेष : पतीला यकृत देणारी 'ती' ठरली कलियुगातली सावित्री - पतीला यकृत देणारी सावित्री

सुनिता माने यांच्या त्यागामुळे पती माधव पांडुरंग माने यांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली आहे. माधव आणि सुनिता हे दाम्पत्य सातारा जिल्ह्यातील पाटणचे रहिवाशी आहे. माधव माने हे सहाय्यक अधीक्षक म्हणून न्यायालयात नोकरीस आहेत. ते काविळीच्या आजाराने त्रस्त होते.

satara
पतीला यकृत देणारी 'ती' ठरली कलियुगातली सत्य सावित्री
author img

By

Published : Mar 8, 2020, 1:30 PM IST

सातारा - सुखाचा संसार सुरू असताना पतीला जीवघेण्या आजाराने ग्रासले. यातून पतीला वाचवण्यासाठी पत्नीने दवाखान्यांचे उंबरे झिजवले. अखेर यकृत प्रत्यारोपण केले तरच पती वाचू शकतील, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता तिने आपल्या यकृताचा भाग पतीला देण्याचा धाडसी निर्णय घेतला. सुनिता माने असे या कलियुगातील सावित्रीचे नाव आहे.

पतीला यकृत देणारी 'ती' ठरली कलियुगातली सत्य सावित्री

यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी पत्नीचे 8 तास आणि पतीचे 14 तास ऑपरेशन सुरू होते. या 14 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पतीला मृत्यूच्या दाढेतून परत आणून त्या कलियुगातील सावित्री ठरल्या. या सावित्रीचे नाव आहे सुनिता माने. त्यांच्या त्यागामुळे पती माधव पांडुरंग माने यांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली आहे. माधव आणि सुनिता हे दाम्पत्य सातारा जिल्ह्यातील पाटणचे रहिवाशी आहे. माधव माने हे सहाय्यक अधीक्षक म्हणून न्यायालयात नोकरीस आहेत. ते काविळीच्या आजाराने त्रस्त होते. आजार वाढत गेला. त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले. परंतू रक्त शुद्ध होत नव्हते. त्यांचे यकृत पूर्णतः निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच रक्ताच्या नात्यातील कोणाचे तरी यकृत प्रत्यारोपण करावे लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

हेही वाचा - महाबळेश्वरमध्ये मुलांना पळवणारी तृतीय पंथीयांची टोळी अटकेत

या शस्त्रक्रियेसाठी आई, वडील, बहीण, भाऊ यांच्या यकृताचे प्रत्यारोपण करावे लागते. सुनिता यांनी आपल्या पतीचा जीव धोक्यात असल्याने स्वतःचे यकृत देण्याचा निर्णय घेतला. त्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाटण आगारात रोखपाल पदावर कार्यरत आहेत. पतीच्या आयुष्याची दोरी मजबूत करण्यासाठी त्यांनी स्वतःचे यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल बारा शस्त्रक्रियांनंतर सुनिता यांच्या यकृताचे माधव यांच्या शरीरात यशस्वी प्रर्त्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर सुनिता माने यांना दोन दिवस आणि पती माधव यांना आठ दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.

हेही वाचा - साताऱ्यात बोअरवेल्सच्या ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी

स्वत:चे यकृत आपल्या पतीला दान करून पतीचा जीव वाचविणार्‍या सुनिता या कलियुगातल्या सावित्री ठरल्या आहेत. दोघांवर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता पती-पत्नी आपापल्या नोकरीत रूजू झाले आहेत. पतीच्या आयुष्यासाठी आपण स्वत:चा विचार केला नाही. पतीचे आयुष्य वाढावे, म्हणून स्वत:चे यकृत प्रत्यारोपण करण्याचा आपण निर्णय घेतला. त्यामुळे होणाऱ्या परिणामांचाही आपण विचार केला नाही, अशी प्रतिक्रिया सुनिता यांनी दिली. पतीचे आयुष्य वाढण्यासाठी जे करावे लागले ते कर्तव्य म्हणून केले, असेही त्या म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.