सातारा - भाजपला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे साताऱ्याचे नेते आणि पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दिपक पवार यांनी पक्षाला राम राम करत राष्ट्रवादीत जाणार असल्याचे जाहीर केले आहे. दिपक पवार २२ सप्टेंबरला शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
दिपक पवार हे शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर विरोधक समजले जातात. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर दिपक पवार यांनी बंडाचा झेंडा फडलवला होता. यानंतर दिपक पवार यांना महामंडळाचे अध्यक्षपद दिले गेले होते. परंतु, दिपक पवार यांनी महामंडळ धुडकावत भाजप सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे, आता शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यात चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दिपक पवार त्यांच्या भुमिकेमुळे सातारा विधानसभा मतदारसंघात चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे.