ETV Bharat / state

वीर धरण पूर्ण भरले; नीरा नदी पात्रात १९५० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू - वीर धरणातून पाण्याचा विसर्ग

नीरा नदीवरील वीर धरण सर्वात प्रथम शंभर टक्के भरले आहे.वीर धरणातून नीरा नदी पात्रात एकूण १९५० क्‍युसेकने विसर्ग सुरु असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

Veer Dam
वीर धरण
author img

By

Published : Aug 14, 2020, 5:28 AM IST

सातारा- जिल्ह्याच्या सीमेवर असणारे वीर धरण सर्वात प्रथम शंभर टक्के भरले आहे. कार्यकारी अभियंता संजय बोडके यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे जलपूजन करुन नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नदी पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गुंजवणी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून वेळवंडी व कानंदी नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी नीरा नदीपात्रात येत आहे.

वीर धरणातून नीरा नदी पात्रात एकूण १९५० क्‍युसेकने विसर्ग सुरु असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे. वीर धरणावर फलटण, इंदापूर, बारामती, माळशिरस, सांगोला हे तालुके ओलिताखाली येतात. मोठे लाभ क्षेत्र या धरणावर अवलंबून आहे. सासवड तालुका, पुरंदर शहरासह अनेक गावांच्या पाणी योजना या धरणावर अवलंबून आहेत.

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु असल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.