ETV Bharat / state

संकटात मानवी साखळीच मदतीला, लहानग्याचं रेस्क्यू ठरले ह्रदयस्पर्शी..

author img

By

Published : Jul 28, 2021, 5:14 PM IST

Updated : Jul 28, 2021, 5:21 PM IST

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील वांग नदीवरील पूल वाहून गेल्याने धनावडेवाडी, शिंदेवाडी गावातील लोक पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यामुळे त्या गावातील 32 कुटुंबातील 100 हून अधिक लोकांना वाचवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे होतं.

-rescue-of-civilians-by-human-chain
-rescue-of-civilians-by-human-chain

सातारा - पुरात पूल वाहून गेल्यानंतर नागरिकांना मानवी साखळीच्या सहाय्याने वाचवतानाचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागातील आहे. एका लहानग्याला मानवी साखळीने ओढ्यावरुन रेस्कू करतान‍ाचे दृश्य मन हेलावून टाकणारे आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल वाहून गेले आहेत. दळणवळण यंत्रणा बंद पडली आहे. सरकारी यंत्रणेला मदत म्हणून अनेक ठिकाणी स्वयंसेवकांची साखळी उभी राहिली आहे.

ढेबेवाडीजवळ वांग नदीवर पूल तुटल्याने मानवी साखळीने बचावकार्य करण्यात आले.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील वांग नदीवरील पूल वाहून गेल्याने धनावडेवाडी, शिंदेवाडी गावातील लोक पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यामुळे त्या गावातील 32 कुटुंबातील 100 हून अधिक लोकांना वाचवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे होतं. त्याहूनही मोठं आव्हान या गावातील लहान बाळाला वाचवण्याचं होत. ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी मानवी साखळी तयार करत या चुमुकल्याचा जीव वाचवला आहे. सध्या हे बाळ आणि सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत.

Last Updated : Jul 28, 2021, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.