ETV Bharat / state

वाधवान कुटुंबीयांना सीबीआयकडून अटक; गृहमंत्र्यांचा दुजोरा - satara police

लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर महाबळेश्वरमधील 'फार्महाऊस'वर कुटुंबासोबत आलेल्या वाधवान कुटुंबीयांना आज सीबीआयने अचानक अटक केली आहे.

wadhwan family arrested
वाधवान कुटुंबीयांना सीबीआयकडून अटक; गृहमंत्र्यांचा दुजोरा
author img

By

Published : Apr 26, 2020, 3:45 PM IST

Updated : Apr 26, 2020, 4:22 PM IST

सातारा - लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर महाबळेश्वरमधील 'फार्महाऊस'वर कुटुंबासोबत आलेल्या वाधवान कुटुंबीयांना आज सीबीआयने अचानक अटक केली आहे. संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर मुंबईहून काही गाड्यांचा ताफा साताऱ्याकडे रवाना झाला. या सर्व लोकांकडे गृहमंत्रालयाची परवानगी होती. काही अनोळखी व्यक्ती साताऱ्यात दाखल झाल्याचे कळताच स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली; आणि हे प्रकरण उघडकीस आले.

  • A #CBI team has taken both Kapil and Dhiraj Wadhwan into custody.@SataraPolice has given them all required assistance & an escort vehicle with 1+3 guard upto Mumbai on a written request.
    The arrest procedures are going on.#LawEqualForAll

    — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चौकशीनंतर संबंधित व्यक्ती मुंबईतील उद्योगपती वाधवान कुटुंबीय असल्याचे समोर आले. यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांच्या विरोधात कडक पावले उचलली. संबंधित सर्व व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच त्यांच्या टेस्ट देखील करण्यात आल्या. क्वारंटाईन काळ संपल्यानंतर वाधवान कुटुंबीयांवर पोलिांसाचा पहारा होता. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी व्यतिरिक्त त्यांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला.

आज अचानक केंद्रीय अन्वेषण संस्थेने त्यांना अटक केली आहे. वाधवान हे अनेक घोटाळयात संशयित आरोपी आहेत. पीएमसी बॅंक घोटाळ्यात देखील त्यांचे नाव समोर आले होते. त्याचप्रमाणे त्यांनी संचारबंदीचे देखील उल्लंघन केले. याप्रकरणी गृह मंत्रालयातून पत्र दिलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला गृहमंत्र्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

स्थनिक प्रशासनाने वाधवान कुटुंबीयांवर गुन्हे दाखल केले होते. ते 14 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारन्टाईन मध्ये होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र आज अचानक सीबीआयचे पथक महाबळेश्वरला दाखल झाले. त्यांनी कपिल व धीरज वाधवान यांना ताब्यात घेतले. आता त्यांना पुण्याला नेण्यात येत आहे.

या बाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून दुजोरा दिला आहे.

Last Updated : Apr 26, 2020, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.