ETV Bharat / state

Sambar Deer: माण तालुक्यात  नागरिकांना  नदी काठी सांबराचे दर्शन

Sambar Deer: हरिण प्रजातीतील सांबर या वन्यप्राण्याचे गोंदवलेकरांना दर्शन झाले. वाट चुकल्याने ते नागरी वस्तीत आले होते. कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे ओढ्याकडेच्या गर्द झाडीत पळाले. दुष्काळी भागात यंदा चांगला पाऊस झाल्याने चारा आणि पाण्याचे स्त्रोत बळकट झाल्याने वन्यजीवांचा वावर वाढत आहे.

Sambar Deer
Sambar Deer
author img

By

Published : Nov 16, 2022, 12:20 PM IST

सातारा: माणसारख्या दुष्काळी तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे हरिण प्रजातीतील सांबर या वन्यप्राण्याचे गोंदवलेकरांना दर्शन झाले आहे. वाट चुकल्याने ते नागरी वस्तीत आले होते. कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे ओढ्याकडेच्या गर्द झाडीत पळाले. दुष्काळी भागात यंदा चांगला पाऊस झाल्याने चारा आणि पाण्याचे स्त्रोत बळकट झाल्याने वन्यजीवांचा वावर वाढत आहे.

गोंदवलेकर सुखावले: सातारा पंढरपूर रस्त्यावरील श्रीराम मंगल कार्यालयाच्या मागील बाजूच्या ओढ्याजवळ नागरीकांना सांबर या वन्य प्राण्याचे दर्शन झाले आहे. सुरुवातीला हे सांबर माणगंगा नदीच्या बाजूने दिलीप कट्टे यांच्या घराजवळून मुख्य रस्त्यावर आले आहे. त्यानंतर रस्ता ओलांडून ते ओढ्याकडे धावत गेले. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे ते भेदरले होते.‌ कुत्र्यांच्या पाठलाग केल्यामुळे ते ओढ्याजवळच्या गर्द झाडीत दिसेनासे झाले आहे.

वनविभागाचे कर्मचारी दाखल : गोंदवले परिसरात सांबर दिसल्याची माहिती वन विभागाला कळताच वनविभागाचे कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले, त्यांनी शोधशोध केली. परंतु सांबर दिसून आले नाही. सांबर हा पूर्णतः निरुपद्रवी प्राणी असून सांबर दिसल्यास त्याला कुणीही इजा पोहचवण्याचा प्रयत्न करू नये. वाढत्या वृक्षतोडीमुळे प्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्याने ते मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. असा प्राणी दिसल्यास वन विभागाला कळविण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मारुती मुळे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.