ETV Bharat / state

साताऱ्यातील 'या' किल्ल्यावर पर्यटकांना तीन दिवस बंदी; महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटकांची गर्दी

Vasota Fort In Satara : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे प्लॅन सुरु झाले आहेत. परंतु, सातारा जिल्ह्यातील बामणोली वन परिक्षेत्रातील वासोटा किल्ल्यावर ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीसाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

Vasota fort in Satara
किल्ल्यावर पर्यटकांना तीन दिवस बंदी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 9:39 PM IST

सातारा Vasota Fort In Satara : नववर्षाचे वेध (New Year Celebration) आता लागले आहेत. या काळात अनेकांना पर्यटनाला जायला आवडतं. साताऱ्यातील वासोटा किल्ला (Vasota Fort ) हा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात असलेल्या वासोटा किल्ल्याची दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांना कायमच भुरळ पडते. सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी असते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत असतात. नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी होऊ नये म्हणून बामणोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे (Vijay Bathe) यांनी तीन दिवस पर्यककांना वासोटा किल्ल्यावर बंदी घातली आहे.

बोटींग क्लबला सक्त सूचना : वासोटा किल्ला हा वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्ग संपत्तीला कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी पर्यटकांना ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोयना जलाशयातून पर्यटकांची वाहतूक न करण्याची सक्त सूचना बोटिंग क्लबना (Boating Club) देण्यात आली आहे. या काळात वासोटा किल्ला परिसरात बेकायदेशीररीत्या आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटकांची गर्दी : नाताळ सण (Christmas Festival) आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वर, (Mahabaleshwar) पाचगणीत दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे हॉटेल्स, रिसॉर्ट हाऊसफुल्ल आहेत. महाबळेश्वरची बाजारपेठ गर्दीने फुलून गेली. पाचगणीच्या टेबल लॅंडवर पर्यटक घोडसवारीचा आनंद लुटत आहेत. तर सध्या हॉर्स रायडिंग, बोटिंग, वासोटा किल्ला ट्रेकिंग यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची पावले वळली आहेत. यासाठी सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

हेही वाचा -

  1. Lonavala Tourism: लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी! मात्र, पर्यटनस्थळावर जाण्यास बंदी
  2. Cyclone Beeperjoy: 'बिपरजॉय' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गेटवे परिसरात सुरक्षा तैनात
  3. Tourists banned at Vasota fort : वासोटा किल्ल्यावर पर्यटकांना तीन दिवस बंदी, अभयारण्यात आढळल्यास होणार कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.