ETV Bharat / state

मुख्याधिकार्‍यांच्या फोटोला चढवला पुष्पहार; खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताचा अज्ञातांकडून निषेध - कराड मुख्याधिकारी बातम्या

कामासाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यात रातोरात जेसीबीने भराव टाकून त्यावर मुख्याधिकार्‍यांचे छायाचित्र ठेऊन पुष्पहार घालण्यात आल्याचा प्रकार कराडमध्ये उघडकीस आला आहे.

मुख्याधिकार्‍यांच्या फोटोला चढवला पुष्पहार; खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताचा अज्ञाताकडून निषेध
author img

By

Published : Nov 13, 2019, 10:55 PM IST

सातारा - कराडमधील सूर्यवंशी मळा येथे ड्रेनेज पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर मंगळवार पेठेतील एका वळणावरही याच प्रकारचा खड्डा करण्यात आला होता. संबंधित खड्ड्यात रातोरात जेसीबीने भराव टाकून त्यावर मुख्याधिकार्‍यांचे छायाचित्र ठेऊन पुष्पहार घालण्यात आल्याचा प्रकार बुधवारी (दि.१३नोव्हेंबर)ला सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे कराडमध्ये खळबळ उडाली आहे. पालिकेच्या बेजबाबदार कारभाराचा निषेध म्हणून अज्ञातांनी केलेल्या या कृत्याची कराडमध्ये चर्चा रंगली आहे.

मुख्याधिकार्‍यांच्या फोटोला चढवला पुष्पहार; खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताचा अज्ञाताकडून निषेध

नगरपालिकेतर्फे ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी सूर्यवंशी मळा परिसरात पाईप टाकण्यासाठी मोठी चर खोदण्यात आली. मंगळवारी(दि.12नोव्हेंबर)ला विजय पांडुरंग शिंदे नावाचा दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून मृत्यू पावला होता.

दरम्यान, मंगळवारी रात्री याच प्रकारच्या एका खड्ड्यात काही दुचाकीस्वार पडल्याच्या घटना समोर आल्या. यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी रात्रीच जेसीबीने त्यामध्ये भराव टाकला. मात्र, या खड्ड्यावर अज्ञाताने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे छायाचित्र ठेऊन त्याला पुष्पहार घातला आहे.

संबंधित प्रकाराची माहिती मिळताच नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पोहोचून मुख्याधिकार्‍यांचे छायाचित्र हटवले. यशवंत डांगे यांच्या कार्यकाळात कराड नगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षणात देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. यानंतर सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला मिळाला. स्वच्छतेसोबतच घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा डेपोच्या ठिकाणी बगीचा, स्वच्छ-सुंदर कराडसाठी वेगवेगळे प्रयोग डांगे यांनी राबवले. स्वच्छतेसाठी स्वत: रस्त्यावर उतरून नागरिकांनाही त्यांनी प्रोत्साहित केले. त्यामुळे ते कराडकरांमध्ये ते लोकप्रिय झाले.

परंतु, ही घटना घडल्यानंतर, मुख्याधिकार्‍यांच्या फोटोला हार घालून त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे विकृत मनोवृत्तीचे लक्षण असून, त्याचा निषेध करत असल्याचे पत्रक नगरपालिका कर्मचारी संघटनेने प्रसिद्ध केले. विजय पांडुरंग शिंदेंचा मृत्यू दुर्दैवी असून, नगरपालिकेसह सर्व कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

घटनेबाबत कराड शहर पोलीस तपास करून दोषींवर कारवाई करतील, असे संघटनेने पत्रकात म्हटले आहे. कामं करताना नागरीकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची सूचना पालिकेतर्फे ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. नगरपालिका यापुढे सर्व बाबींची अधिक खबरदारी घेणार असून, कोणत्याही कामाच्या ठिकाणी अपघात होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे संघटनेने पत्रकात नमूद केले आहे.

Intro:कराडमधील सूर्यवंशी मळा येथे ड्रेनेज पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडल्याने मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला असताना मंगळवार पेठेतील एका वळणावरही तसाच खड्डा काढण्यात आला होता. तो खड्डा रातोरात जेसीबीने भरून त्यावर मुख्याधिकार्‍याचे छायाचित्र ठेऊन त्याला पुष्पहार घालण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे कराडमध्ये खळबळ उडाली. Body:कराड (सातारा) - कराडमधील सूर्यवंशी मळा येथे ड्रेनेज पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडल्याने मोटरसायकलस्वाराचा मंगळवारी मृत्यू झाला असताना मंगळवार पेठेतील एका वळणावरही तसाच खड्डा काढण्यात आला होता. तो खड्डा रातोरात जेसीबीने भरून त्यावर मुख्याधिकार्‍याचे छायाचित्र ठेऊन त्याला पुष्पहार घालण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. पालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून अज्ञातांनी केलेल्या या कृत्यामुळे कराडमध्ये खळबळ उडाली. 
  कराड नगरपालिकेतर्फे ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी सूर्यवंशी मळा परिसरात ड्रेनेज पाईप टाकण्यासाठी मोठी चर खोदण्यात आली आहे. मंगळवारी विजय पांडुरंग शिंदे (रा. मंगळवार पेठ, कराड) हे मोटरसायकलसह त्या खड्ड्यात पडून गंभीररित्या जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी रात्री तसाच एक खड्डा मंगळवार पेठेतील एका वळणावर काढण्यात आला होता. त्या खड्ड्यातही अनेक मोटरसायकलस्वार पडले. त्यामुळे नागरीकांनी रात्रीच जेसीबीने तो खड्डा भरून घेतला. मात्र, त्याच खड्ड्यावर अज्ञाताने मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे छायाचित्र ठेऊन त्याला पुष्पहार घातला. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. त्यामुळे कराडात खळबळ उडाली. खड्ड्यात पडून बळी गेलेल्या घटनेचा निषेध म्हणून अज्ञात व्यक्तीकडून मुख्याधिकार्‍यांचा निषेध करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्याधिकार्‍यांचे छायाचित्र हटविले. 
   यशवंत डांगे यांच्या कार्यकाळात कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. त्याच बरोबर सरकारचा कोट्यवधी रूपयांचा निधीही कराड पालिकेला मिळाला. स्वच्छतेबरोबरच घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा डेपोच्या ठिकाणी सुंदर बगीचा, स्वच्छ-सुंदर कराडसाठी वेगवेगळे प्रयोग डांगे यांनी राबविले. स्वच्छतेसाठी स्वत: रस्त्यावर उतरून नागरीकांनाही स्वच्छतेसाठी त्यांनी प्रोत्साहित केले. त्यामुळे ते कराडकरांमध्ये ते लोकप्रिय ठरले. तसेच कराड नगरपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात कार्यक्षम मुख्याधिकारी म्हणून त्यांची नोंद झाली आहेConclusion:   कराड मुख्याधिकार्‍यांच्या फोटोला हार घालून कार्यतत्पर मुख्याधिकार्‍यांचे मनोबल खच्ची करण्याचा केलेला प्रयत्न हा विकृत मनोवृत्तीचे लक्षण असून आम्ही त्याचा निषेध करत असल्याचे पत्रक नगरपालिका कर्मचारी संघटनेने प्रसिध्दीस दिले आहे. विजय पांडुरंग शिंदे यांचा झालेला मृत्यू दुर्दैवी व दु:खदायक आहे. नगरपालिका आणि सर्व कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहेत. या घटनेबाबत कराड शहर पोलीस तपास करून दोषींवर नक्कीच कारवाई करतील, असे संघटनेने पत्रकात म्हटले आहे. कामे करताना नागरीकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची सूचना पालिकेतर्फे ठेकेदारांना केल्या आहेत. नगरपालिका यापुढे आणखी खबरदारी घेणार आहे. कोणत्याही कामाच्या ठिकाणी अपघात होणार नाही, याची दक्षता नगरपालिका घेईल, असेही संघटनेने पत्रकात म्हटले आहे. 
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.