सातारा - खंडाळा तालुक्यातील वीर धरणात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेह आढळून तीन दिवस उलटले तरीही त्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. या व्यक्तीचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हेही वाचा - सावधान! बॉडिबिल्डिंगसाठी स्टिरॉईड्स घेणे पडले महागात, ठाण्यात 23 वर्षीय युवकाचा मृत्यू
तीन दिवसांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस कसून प्रयत्न करत आहेत. मृत व्यक्तीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. संबधिताबद्दल काही माहिती मिळाल्यास शिरवळ पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस प्रशासानाकडून करण्यात आले आहे.