सातारा : राज्यपाल हटावसाठी त्यांनी महाराष्ट्रात आंदोलन न करता दिल्लीत करावे, असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला ( Udayanraje should protest in Delhi ) आहे. राज्यपालांना हटवण्याची मागणी करण्यामागे त्यांचा काही राजकीय स्वार्थ आहे का? हेही पाहिले पाहिजे, असे शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले ( MLA Shivendraraje Bhosle advice Udayanraje )आहे.
शिवाजी महाराजांबद्दलच वक्तव्याचा निषेध : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध केला आहे. त्यांना हटवण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली ( Udayanraje demand remove governor ) आहे. परंतू, यामागे त्यांचा काही राजकीय स्वार्थ आहे का? हेही पाहिले पाहिजे. राज्यपाल हटावसाठी त्यांनी महाराष्ट्रात आंदोलन न करता दिल्लीत करावे, असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
राज्यपालांचा निर्णय दिल्लीत होतो : राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यासंदर्भातील निर्णय दिल्लीत होत असतो. त्यामुळे राज्यपाल हटाव मागणीसाठी महाराष्ट्रात आंदोलन करून काय उपयोग? त्यापेक्षा उदयनराजेंनी दिल्लीत जावे. ते खासदार आहेत. दिल्लीत आंदोलन करायला त्यांना कोणी अडवलंय, असा सवाल शिवेंद्रराजेंनी केला.
उदयनराजेंचा फडणवीसांवर विश्वास आहे का ? : आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, मी स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आमचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी यासंदर्भात लक्ष घालतो, असे सांगितले आहे. आता उदयनराजेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे की नाही हे त्यांनाच माहीत. इतिहासाची मोडतोड करून कोणत्याही महापुरूषांबद्दल कोणीच वक्तव्ये करू नयेत, असे आपले मत असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.