ETV Bharat / state

उदयनराजेंना मंत्री करा, 'रक्ताने पत्र' लिहून अमित शाहांना साकडे

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागला. यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागली. यातच एका कार्यकर्त्याने केंद्रीय गृहमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिले आहे.

udayanraje bhosale news
गृहमंत्री अमित शाह यांना साताऱ्यातून 'रक्ताचे पत्र'; उदयनराजे भोसलेंसाठी मंत्रीपदाची मागणी
author img

By

Published : Feb 10, 2020, 11:40 PM IST

Updated : Feb 11, 2020, 10:09 AM IST

सातारा - ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागला. यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागली. यातच एका कार्यकर्त्याने भोसले यांना राज्यसभेवर पाठवा या मागणीसाठी गृहमंत्री अमित शाह यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. निलेश जाधव, असे या चाहत्याचे नाव असून त्याने उदयनराजेंसाठी मंत्रिपदाची देखील मागणी केली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांना साताऱ्यातून 'रक्ताचे पत्र'; उदयनराजे भोसलेंसाठी मंत्रिपदाची मागणी

लोकसभा पोटनिवडणुकीत साताऱ्याच्या रिंगणात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पारंपरिक खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात दंड थोपटले होते. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक हरल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी जोर धरू लागली.

यानंतर जाधव याने अमित शाहांना रक्ताने पत्र लिहून उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली आहे. तसेच त्याने मंत्रिपद देखील मागितले आहे. स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने या प्रकारे मागणी केल्याने साताऱ्यात हा चर्चेचा विषय ठरत आहे. येणाऱ्या एप्रिल महिन्यात राज्यातील 19 राज्यसभा खासदारांपैकी 7 खासदारांची मुदत संपणार आहे. यातील भाजपच्या कोट्यातून उदयनराजेंची वर्णी लावण्याची मागणी होत आहे.

Intro:सातारा राष्ट्रवादी काँग्रेस मधून सलग तीन वेळा खासदार झालेले व मागील आठ महिन्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस ला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांचे मित्र व राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी दणदणीत तबल एक लाख मतांनी पराभव केला. त्यानंतर उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी कार्यकर्ते मागणी करू लागले आहेत. याचसंबंधी त्यांच्या एका चाहत्याने निलेश जाधव याने गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहिलं आहे.

Body:जाधव याने अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहित उदयनराजेंना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. साताऱ्यातील निलेश जाधव याने हे पत्र लिहिलं आहे आणि विशेष म्हणजे त्याचा आज वाढदिवस आहे. दरम्यान, येत्या एप्रिल महिन्यांत महाराष्ट्रातील 19 राज्यसभा खासदारांपैकी 7 खासदारांची मुदत संपतीये. त्यात भाजपच्या कोट्यातून उदयनराजेंची वर्णी लागू शकते.

काय लिहलय पत्रात

माननीय श्री.अमित शाहजी (गृहमंत्री भारत सरकार)
मी निलेश सुर्यकांत जाधव सांगु इच्छितो की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर खासदार करुन मंत्रीपद मिळावे आणि छत्रपतीच्या गादीचा सन्मान करावा अशी विनंती करतो आपला निलेश जाधव

Conclusion:बाईट- निलेश जाधव
Last Updated : Feb 11, 2020, 10:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.