ETV Bharat / state

'उदयनराजे काय आहेत हे अजून रामराजेंना व शिवेंद्रराजेंना समजलेच नाही'

लोकसभा निवडणूक झाल्यामुळे उदयनराजे काहीतरी करतील, अशी शिवेंद्रराजेंना भीती आहे. परंतु, त्यांना उदयनराजे काय आहेत ते अजून समजलेले नाही.कशातच काही नसताना रामराजे व शिवेंद्रराजे हे खुसपूस काढत असल्याचे उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे, रामराजे व शिवेंद्रराजे
author img

By

Published : Jun 19, 2019, 5:07 PM IST

सातारा - लोकसभा निवडणूक झाल्यामुळे उदयनराजे काहीतरी करतील, अशी शिवेंद्रराजेंना भीती आहे. परंतु, त्यांना उदयनराजे काय आहेत ते अजून समजलेले नाही. मला जर काही करायचे असते तर यापूर्वीच केले असते असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. कशातच काही नसताना रामराजे व शिवेंद्रराजे हे खुसपूस काढत आहेत. तुम्हाला काय करायचे ते करा. मला जे करायचे ते मी करणार, असेही उदयनराजे म्हणाले.

साताऱ्यात नीरा देवघर पाणी प्रश्‍नावरून राजकारण चांगलेच तापत चालले आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांनी एकमेकांवर तोफ डागल्यानंतर आता आमदार शिवेंद्रराजे व उदयनराजे यांच्यातही कलगीतुरा रंगला आहे. शिवेंद्रराजेंनी सोमवारी ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी उदयनराजेंची भूमिका असल्याची टीका केल्यानंतर खासदारांनी त्यांचा समाचार घेत आमदारावर पुन्हा एकदा निशाना साधला.

माझ्या विरोधात ज्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, त्यांनी ते सादर करावे. त्याला मी उत्तर देण्यास तयार आहे. त्यावेळी जे आरोप करतील त्यांनीही हजर रहावे. लोकसभा निवडणुकीत आमचे मनोमीलन झाल्यानंतर शिवेंद्रराजेंनी मला एवढी कडाडून मिठी मारली नाही. परंतु, त्यांना नरेंद्र पाटील यांच्या मिशा आवडल्या असाव्यात. त्यामुळेच शिवेंद्रराजेंनी त्यांना कडाडून मिठी मारली होती, अशा शब्दात खा. उदयनराजेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.

Intro:सातारा : लोकसभा निवडणूक झाल्यामुळे उदयनराजे काहीतरी करतील, अशी शिवेंद्रराजेंना भीती आहे. परंतु, त्यांना उदयनराजे काय आहेत ते अजून समजलेले नाही. मला जर काही करायचे असते तर यापूर्वीच केले असते. कशातच काही नसताना रामराजे व शिवेंद्रराजे हे खुसपूस काढत आहेत. तुम्हाला काय करायचे ते करा. मला जे करायचे आहे ते मी करणार, अशी टीका खा. छत्रपती उदयनराजेंनी भोसले यांनी केली आहे.
Body:सातार्यात नीरा देवघर पाणी प्रश्‍नावरून राजकारण चांगलेच तापत चाले आहे. ना. रामराजे नाईक निंबाळकर व खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एकमेकांवर तोफ डागल्यानंतर आता आ. छत्रपती शिवेंद्रराजे व खा. छत्रपती उदयनराजे यांच्यातही कलगीतुरा रंगला आहे. शिवेंद्रराजेंनी सोमवारी ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी उदयनराजेंची भूमिका असल्याची टीका केल्यानंतर खासदारांनी त्याचा समाचार घेत आमदारावर पुन्हा एकदा निशाना साधला.
ते म्हणाले, माझ्या विरोधात ज्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत त्यांनी ते सादर करा. त्याला मी उत्तर देण्यास तयार आहे. त्यावेळी जे आरोप करतील त्यांनीही हजर रहावे. लोकसभा निवडणुकीत आमचे मनोमीलन झाल्यानंतर शिवेंद्रराजेंनी मला एवढी कडाडून मिठी मारली नाही. परंतु, त्यांना नरेंद्र पाटील यांच्या मिशा आवडल्या असाव्यात. त्यामुळेच शिवेंद्रराजेंनी त्यांना कडाडून मिठी मारली होती, अशा शब्दात खा. उदयनराजेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.