सातारा - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती घेतलेले माजी खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या सोबत आमदार शिवेंद्रराजेराजे भोसले हे विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी एकत्र निघाले.
शिवेंद्रराजे भोसले यांनी जावळी मतदारसंघातून विधानसभेसाठी अर्ज भरला असून, उदयनराजे यांनी साताऱ्यातून लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला. काही वेळातच उदयनराजे व शिवेंद्रराजे भोसले हे दोघेही एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
भव्य मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन करत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजवाड्यावरून निघाले. यानंतर मोठी रॅली काढण्यात आली. या ठिकाणी हजरोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत.
दोघांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता हे दोघेही भारतीय जनता पक्षाकडून अर्ज भरणार आहेत.