ETV Bharat / state

सातारा : दोन परप्रांतीय युवक कृष्णा नदीत बुडाले, एकाचा मृतदेह सापडला - दत्तनगर

कृष्णा नदी पात्रात पोहण्यासाठी उतरलेले दोन परप्रांतीय युवक शनिवारी (दि. 8 फेब्रुवारी) वाहून गेले. यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या युवकाचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरू होता.

शोध घेताना बचाव पथक
शोध घेताना बचाव पथक
author img

By

Published : Feb 9, 2020, 9:55 AM IST

सातारा - पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा नदीत दोघे शनिवारी (दि. 8 फेब्रुवारी) सायंकाळी वाहून गेले आहे. यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. शहराजवळ कोडोलीतील (ता. सातारा) दत्तनगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.

सातारा : दोन परप्रांतीय युवक कृष्णा नदीत गेले वाहून, एकाचा सापडला मृतदेह

गंगाप्पा गारी आदर्श (वय 20 वर्षे, रा. कोनापुरम, अनंतपूर, आंध्रप्रदेश) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून सागर एस. सिद्धाप्पा (वय 19, रा. नेहरु कॉलनी, गौरीबिदनूर, कर्नाटक) या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यापासून ४ किलोमीटर अंतरावर कोडोली हे गाव आहे. या गावातील दत्तनगर भागात कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथील सुमारे १२ ते १५ जण एकत्र रहायला आहेत. हे सर्व युवक सेल्समन म्हणून काम करत असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा - साताऱ्यात सावकारीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आदर्श व सिद्धाप्पा मित्रांसह कृष्णा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुवून झाल्यानंतर हे सगळे पाण्यात आंघोळीसाठी उतरले. त्यातील सागर सिद्धाप्पा व गंगाप्पा आदर्श यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी गावातील पोलीस पाटील व पोलिसांना माहिती दिली. सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे व त्यांचे पथक तसेच शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे अध्यक्ष चंद्रसेन पवार, अब्दुल सत्तार, देवा गुरव, गणेश निपाने, आदित्य पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या युवकांनी नदीपात्रात उतरून शोधकार्य सुरू केले. त्यावेळी गंगाप्पा आदर्श याचा मृतदेह सापडला. मात्र, सागर सिद्धाप्पा याचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही.

हेही वाचा - 'सीएए'विरोधात महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत आंदोलन

Intro:सातारा: पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा नदीत बुडून दोघांचा आज सायंकाळी मृत्यू झाला. यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून दुस-या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. शहराजवळ कोडोलीतील (ता. सातारा) दत्तनगरमध्ये ही दुर्देवी घटना घडली.

Body:गंगाप्पा गारी आदर्श (वय २०, रा. कोनापुरम, अनंतपूर आंध्रप्रदेश) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, सागर एस सिद्धाप्पा (वय १९, रा. नेहरु कॉलनी, गौरीबिदनूर कर्नाटक) या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, साता-यापासून ४ किलोमीटर अंतरावर कोडोली हे गाव आहे. या गावातील दत्तनगर भागात कर्नाटक, मध्यप्रदेश आंध्रप्रदेश येथील सुमारे १२ ते १५ जण एकत्र रहायला आहेत. हे सर्व युवक सेल्समन म्हणून काम करत असल्याची माहिती समोर येते

शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आदर्श व सिद्धाप्पा मित्रांसह कृष्णा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुवून झाल्यानंतर हे सगळे पाण्यात आंघोळीसाठी उतरले. त्यातील सागर सिद्धाप्पा व गंगाप्पा आदर्श यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी गावातील पोलिसपाटील व पोलिसांना माहिती दिली. सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे व त्यांची टीम तसेच शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे अध्यक्ष चंद्रसेन पवार, अब्दुल सतार, देवा गुरव, गणेश निपाने, आदित्य पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या युवकांनी नदीपात्रातून उतरून शोधकार्य सुरु केले. त्यावेळी गंगाप्पा आदर्श याचा मृतदेह सापडला. मात्र, सागर सिद्धाप्पा याचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही.
Conclusion:सातारा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.