सातारा : देशी बनावटीची पिस्टल विक्री (Sale of desi made pistons) करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील तडीपार गुंडाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले. (tadipar gangster arrested with pistol satara) त्याच्याकडून दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे (pistol and cartridge seized satara) आणि मोटरसायकल, असा पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. माण तालुक्यातील शेणवडी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. परशुराम रमेश कुरवले (रा. सोमवार पेठ, कराड, सध्या रा. आटपाडी, जि. सांगली), असे संशयिताचे नाव आहे.
एलसीबीच्या विशेष पथकाची कारवाई - पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोन्हाडे यांनी सातारा जिल्ह्यात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना केली आहे. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक तयार केले आहे.
सापळा रचून संशयिताला पकडले - रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार शेणवडी फाटा (ता. माण) येथे गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यांनी विशेष पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विशेष पथकाने शेणवडी फाट्यावर सापळा रचला. त्याठिकाणी मोपेडवरून आलेल्या तरूणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीची दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. पिस्टल, काडतुसे आणि मोपेड, असा पावणे दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलीस अधीक्षकांकडून विशेष पथकाचे कौतुक - ही कारवाई विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबड़े, अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगथने, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विशाल पवार, मोहन पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, मयूर देशमुख, स्वप्नील दौंड, धीरज महाडीक, मोहसीन मोमीन, शिवाजी गुरव यांनी केली. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकाचे कौतुक केले.