ETV Bharat / state

साताऱ्यात तीन अपघातांत दोघे ठार, महिला कॉन्स्टेबलसह चौघे जखमी - karad accident

कराड आणि पाटण तालुक्यासाठी मंगळवार घातवार ठरला. मंगळवारी दोन्ही तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एक शिक्षक आणि व्यावसायिक ठार, तर महिला कॉन्स्टेबलसह चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

साताऱ्यात तीन अपघातांत दोघे ठार, महिला कॉन्स्टेबलसह चौघे जखमी

author img

By

Published : Mar 24, 2021, 10:34 PM IST

कराड (सातारा) : कराड आणि पाटण तालुक्यासाठी मंगळवार घातवार ठरला. मंगळवारी दोन्ही तालुक्यांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत एक शिक्षक आणि व्यावसायिक ठार, तर महिला कॉन्स्टेबलसह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. श्रीराम रणसिंग(रा. वारूंजी, ता. कराड), बबन बापू मोहिते(रा. बनपुरी, ता. पाटण) अशी मृतांची नावे आहेत. तर कराड शहर पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल रेश्मा संतोष विठेकर या गंभीर जखमी आहेत.

अपघातात शिक्षकाचा मृत्यू
श्रीराम रणसिंग हे मंगळवारी दुपारी मित्रासमवेत दुचाकीवरून विजयनगरकडे जात असताना स्वीफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना रणसिंग यांचा मृत्यू झाला. ते पाटण तालुक्यातील गारवडे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांचा लौकीक होता. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
कराड-पाटण मार्गावरील विमानतळ परिसरात झालेल्या दुसर्‍या दुचाकी अपघातात कराड शहर पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल रेश्मा संतोष विठेकर या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने कृष्णा हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ढेबेवाडी-सणबूर रस्त्यावर अपघात

ढेबेवाडी-सणबूर रस्त्यावर मंगळवारी दुपारी दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही दुचाकींवरील चौघेजण रस्त्यावर फेकले गेले. ढेबेवाडीच्या आठवडा बाजारामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. अपघातानंतर रस्त्याने ये-जा करणारे वाहन चालक तसेच स्थानिक रहिवाशांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना त्यांनी रूग्णवाहिका आणि खासगी वाहनातून कराडमधील खासगी रूग्णालयात पाठवले. परंतु, गंभीर जखमी बबन मोहिते यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले आहे. अपघातातील मृत बबन मोहिते हे व्यवसायिक होते. ढेबेवाडी परिसरात त्यांचा मोठा लोकसंपर्क होता. कराड आणि पाटण तालुक्यात झालेल्या तीन भीषण अपघातांमुळे मंगळवार हा घातवार ठरला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.