ETV Bharat / state

Afzal Khan Graves : अफजलखान कबरीच्या शेजारी अजून दोन कबरी, प्रशासकीय वर्तुळात खळबळ - Afzal Khan grave

अफझलखानाच्या ( Afzal Khan ) कबरीवरील अतिक्रमण हटवल्यानंतर कबरीजवळ ( Afzal Khan Tomb ) आणखी दोन कबरी आढळून आल्या आहे. दोन कबरी आढळल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला असून प्रशासन आता त्या कबरींची माहिती घेत ( Information about grave begins ) आहे.

Afzal Khan Tomb
Afzal Khan Tomb
author img

By

Published : Nov 12, 2022, 4:10 PM IST

सातारा - प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीजवळ ( Afzal Khan Tomb ) आणखी दोन कबरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन कबरी आढळल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला असून प्रशासन आता त्या कबरींची माहिती ( Information about grave begins ) घेत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी पुर्वी केवळ अफजलखान ( Afzal Khan ) आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा ( Syed Banda Tomb ) यांच्याच कबरी होत्या. मात्र, अतिक्रमणे काढल्यानंतर त्यांच्या कबरीशेजारी आणखी दोन कबरी ( Two grave ) आढळून आल्याने प्रशासन हडबडून गेले आहे.

कबरींची माहिती घेण्यास सुरूवात - अफजलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त केल्यानंतर शिवप्रेमींमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अतिक्रमणे हटविल्यानंतर अफजलखान कबरीचा परिसर पुर्णपणे मोकळा झाला आहे. त्यामुळे अफजलखान आणि सय्यद बंडा यांच्या कबरींशेजारी अजून दोन कबरी असल्याचे निदर्शनास आले. यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोन कबरींपैकी एक कबर अफजलखान आणि सय्यद बंडा यांच्या कबरीशेजारी आहे, तर दुसरी कबर अतिक्रमण काढण्यात आलेल्या जागेत आहे. प्रशासनाने या कबरींबद्दलची माहिती घेण्यास ( Information about grave begins ) सुरूवात केली आहे.

कबरीला दिलं होत मशिदीचं स्वरूप - अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती. तसेच कबरीला मशिदीचे स्वरूप देऊन त्याठिकाणी अनाधिकृत खोल्या बांधण्यात आल्या होत्या. काही फूट जागेत असणार्‍या कबरींशेजारी अतिक्रमण करत वन विभागाची मोठी जागा व्यापली होती. अफजलखानाच्या उदात्तीकरणाविरोधात हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमी सातत्याने आंदोलन करत होते. तसेच कबरीशेजारील अतिक्रमणाचा वाद 1990 पासून सुरु होता. न्यायालयाने कबरीच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करत प्रशासनाने 15 ते 20 गुठ्यांच्या परिसरात करण्यात आलेली अतिक्रमणे हटवली.

कबरींवरून वातावरण तापणार - अफजलखान कबरीच्या परिसरात आढळलेल्या दोन कबरींमुळे आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होऊन वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अतिक्रमण करणार्‍यांनी मूळ कबरींच्या शेजारीच आणखी दोन कबरी उभारल्याचे चित्र समोर आले आहे. या दोन कबरींपैकी एक कबर सेवेकर्‍याची असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसर्‍या कबरीबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या कबरी आढळल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासनाने दोन्ही कबरींची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.