ETV Bharat / state

पुण्याच्या आमदाराचे 'हनी ट्रॅप' तरुणीनेच आणले उघडकीस, दोघांवर गुन्हा

आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करून त्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा डाव शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे व सोमनाथ शेडगे या तिघांनी एका युवतीच्या मदतीने आखला होता. मात्र संबंधित युवतीनेच या प्रकाराची माहिती आमदारांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते -पाटील यांना दिली होती.

सातारा पोलीस ठाणे
सातारा पोलीस ठाणे
author img

By

Published : May 2, 2021, 8:55 PM IST

Updated : May 3, 2021, 4:46 PM IST

सातारा - पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना 'हनी ट्रॅप' मध्ये अडकवण्याचे षडयंत्र रचणार्‍या दोघा संशयितांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहुल किसन लांडगे (रा. चाकण पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करून त्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा डाव शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे व सोमनाथ शेडगे या तिघांनी एका युवतीच्या मदतीने आखला होता. मात्र संबंधित युवतीनेच या प्रकाराची माहिती आमदारांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते -पाटील यांना दिली होती.

व्हाट्सअपवर अश्लील चॅटिंग

सातारा तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणाचा भांडाफोड करणाऱ्या युवतीनेच आपला विनयभंग झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. 15 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता युवती घरात एकटी असल्याचे पाहून शैलेश व राहूल यांनी जबरदस्तीने घरात प्रवेश करून युवतीचा विनयभंग केला. यावेळी शैलेश मोहिते पाटील याने युवतीच्या व्हाट्सअपवर अश्लील भाषेत चॅटिंग केल्याचे समोर आले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय हंकारे करत आहेत.

Last Updated : May 3, 2021, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.