सातारा - गाडी ठोकल्याचे भासवून सहाजणांनी ट्रकचालक आणि क्लीनरला मारहाण केल्याची घटना काल रात्री साडेअकरा वाजता सातारा-लोणंद रस्त्यावर घडली. यावेळी चोरट्यांनी त्यांच्याकडील पाच हजार रुपयाची रक्कमही चोरून नेली.
दरोड्याचा गुन्हा दाखल -
याप्रकरणी सहाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विनायक निवृत्ती मुठे (रा. घोटी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) हे ट्रक घेऊन साताऱ्याहून लोणंदकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकावरील सहाजणांनी ट्रक अडवला. माझी गाडी का ठोकली, असे विचारून मुठे व सोबत असलेल्या क्निनरला त्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील पाच हजारांची रोकड घेऊन त्यांनी पलायन केले. या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयितांची नाकाबंदी केली. मात्र, आरोपींना पळून जाण्यात यश आले.
हेही वाचा - हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी पिक विम्याची रक्कम मुख्यमंत्र्याना केली परत