ETV Bharat / state

Tourist from Karad drowned : शिवसागर जलाशयात स्कूटर बोट पलटी; कराडमधील पर्यटक बुडाला - पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल

एका कंपनीतील आठ जण पर्यटनासाठी गेले होते. शिवसागर जलाशयात दुर्घटना घडली. कराडमधील पर्यटक पाण्यात बुडाला (Tourist from Karad drowned ) असून त्याचा शोध लागलेला नाही. (Shivsagar reservoir search operation underway )

Tourist from Karad drowned
शिवसागर जलाशयात स्कूटर बोट पलटी
author img

By

Published : Dec 28, 2022, 9:23 AM IST

सातारा : शिवसागर जलाशयात वॉटर स्कूटर बोट पलटी ( scooter boat overturned in Shivsagar reservoir ) होऊन कराड तालुक्यातील पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संकेत संग्राम काळे वय २७, राहणार वाठार, तालुका कराड, असे पर्यटकाचे नाव (Tourist from Karad drowned ) आहे. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. म्हावशी तालुका जावळी हद्दीमध्ये मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.

जलाशयात स्कूटर बोट पलटी : बेकायदेशीर टेंन्ट कॅंम्पिंगवर अनधिकृतरित्या चालविली जाणारी ही बोट होती. जावळी तालुका हद्दीत शिवसागर जलाशयालगत असलेल्या एका टेंट कॅम्पिंगवर कराड तालुक्यातील काही पर्यटक पर्यटनासाठी गेले होते. रात्री सातच्या सुमारास वॉटर स्कूटर बोटिंग करत असताना स्कूटर पलटी होऊन संकेत काळे हा पर्यटक पाण्यात बुडाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले. शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. ( Shivsagar reservoir search operation underway )

बुडालेल्या पर्यटकाचा शोध सुरू : एका कंपनीतील आठ जण पर्यटनासाठी गेले होते. शिवसागर जलाशयात ( Shivsagar Reservoir ) रात्री सातच्या सुमारास ते वॉटर स्कूटर बोटिंग करत असताना स्कूटर अचानक पलटी झाली. या दुर्घटनेत कराडमधील पर्यटक शिवसागर जलाशयात बुडाला. या प्रकाराची माहिती मेढा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल ( Police rushed to spot immediately ) झाले. त्यांनी महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण करून शोधमोहीम सुरू केली. मात्र, बुडालेल्या पर्यटकाचा शोध लागला नाही. आज पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

खालापुर तालुक्यात घडली होती अशी घटना : खालापुर तालुक्यातील चौक येथील मोरबे धरणात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना 24 जुलैला संध्याकाळी घडली होती. त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या टीमला यश आले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक बुडालामुंबई चेंबूरहुन वर्षाला सहलीसाठी लोक येत असतात. तसेच, पाऊसकाळ्याचा आनंद घेण्यासाठी काही तरुण मोरबे धरणावर आले होते. मात्र एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो मोरबे धरणात बुडाला. मृतदेह बाहेर काढण्यात अपघातग्रस्त टीमला यश आले. अपघातग्रस्त टीमने त्याचा मृतदेहाचा शोध लावला.

मंगळुरू येथे मासेमारीसाठी निघालेली बोट बुडाली : खराब हवामानामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी निघालेली एक बोट अरबी समुद्रात बुडाली. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पानंबूरपासून सुमारे 90 नॉटिकल मैल खोल समुद्रात ही घटना घडली. खराब हवामानामुळे समुद्र खवळला, त्यामुळे मासेमारी करणारी बोट बुडाली. बोटीतील 11 मच्छिमारांना जवळच असलेल्या दुसऱ्या जहाजाने वाचवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.