ETV Bharat / state

पाटण तालुक्यात एकूण 76 व्यक्ती विलगीकरण कक्षात दाखल

पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात एकूण 67 व तळमावले कोरोना केअर सेंटरमध्ये 9 अशा एकूण 76 व्यक्ती दाखल असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी.  पाटील यांनी दिली.

पाटण
पाटण
author img

By

Published : May 23, 2020, 5:42 PM IST

सातारा - पाटण तालुक्यात आत्तापर्यंत सहाजणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी एक बालक कोरोनामुक्त झाले तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उर्वरित चार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात एकूण 67 व तळमावले कोरोना केअर सेंटरमध्ये 9 अशा एकूण 76 व्यक्ती दाखल असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.

पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील डेरवन येथील एका दहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागन झाली होती. त्याच्यावर उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर खंडीत झालेल्या कोरोनाने गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा डोके वर काढले आहे. यात पहिल्यांदा ढेबेवाडी विभागातील बनपुरी येथील एका वृद्ध महिलेचा मरणोत्तर चाचणीनंतर कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर कोयना विभागातील शिरळ येथील एका सत्तर वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. गुरुवारी पुन्हा तालुक्यातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. यामध्ये पाटण शहरानजीकच्या म्हावशी येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच हा कर्मचारी मुबंई येथून गावी आला होता. कुंभारगाव (चाळकेवाडी) येथील एका प्राथमिक शाळेत विलगीकरण केलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागणा झाली तर रात्री उशिरा (धामणी) कुंभारगाव येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. सध्या संबंधित कोरोनाबाधित रुग्णांवर कृष्णा हाॅस्पीटल कराड येथे उपचार सुरू आहेत.

यापूर्वी पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये 46 व्यक्ती विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्या होत्या. यापैकी 38 व्यक्तींचे स्वॅब नमुने गुरुवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर यापूर्वी तळमावले येथील नऊ व भारसाखळे येथील संशयित मृत व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी म्हावशी येथील 12 व चाळकेवाडी येथील 9 अशा हाय रिस्कमधील 21 व्यक्तींना पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याने येथील संख्या आता 67 झाली आहे.

याशिवाय धामणी येथील 9 हाय रिस्कमधील व्यक्तींना तळमावले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या पाटण येथील शंभर व तळमावले येथील 150 खाटाचे कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 76 व्यक्तींना दाखल करण्यात आले आहे. यापैकी उर्वरित व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन तेही तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. म्हावशी, चाळकेवाडी, धामणी ही गावे सील करण्यात आल्याची माहिती श्रीरंग तांबे यांनी दिली.

दरम्यान, शिरळ येथील संबंधित कोरोनाबाधित रुग्ण हा प्राथमिक आरोग्य केंद्र हेळवाक (कोयनानगर), पाटण येथील खासगी व ग्रामीण रुग्णालयात गेला होता. खबरदारी म्हणून या ठिकाणचे डाॅक्टर्स व कर्मचारी यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. संबंधित व अन्य कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीय, नातेवाईक यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तथापी, जर गरज वाटली तरच या डाॅक्टर्स व कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, यातील सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत विलगीकरणात जाण्याची वेळ व अहवालाबाबतची टांगती तलवार या सर्वांवरच राहणार आहे. यामुळे त्यांच्या वैद्यकीय सेवा, व्यवसाय व इतर सर्वच बाबींवर मर्यादा आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.