सातारा - जिल्ह्यासाठी शनिवार हा चिंतेत भर टाकणारा ठरला असून एका दिवसात जिल्ह्यात 71 बाधितांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 278 वर पोहोचली आहे. 157 रुग्ण उपचार घेत आहेत. यात मुंबई येथून आलेल्या आणि पाचगणीत मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही समावेश असल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या 7 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीवर यांनी याबाबतची माहिती दिली.
जिल्ह्यात 41 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी येऊन साताऱ्यात धडकली. शनिवारी सकाळी 41 लोक बाधित असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. त्यानंतर रात्री उशिरा 5 व 26 असे आणखी 31 बाधित असल्याचे जाहीर करण्यात आले. पाचगणी येथे मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 7 झाली आहे.
जिल्ह्यात नव्याने बाधित निष्पन्न झालेल्या 31 रुग्णांची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे :
कराड - वानरवाडी 5, शेणोली 3
जावळी - गवडी, कसबे बामणोली 2, सायगाव 1
खंडाळा - पळशी 3, अंधोरी 1
महाबळेश्वर - पाचगणी 1 (महिला मृत)
वाई - वाई व देगाव प्रत्येकी 1
सातारा - चिंचणेर-लिंब 1, कुस खुर्द 3
खटाव -गादेवाडी 3, मांजरवाडी- चिंचणी- खतगूण प्रत्येकी 1
कोरेगाव - वाघोली 2
जिल्ह्यात गेल्या चार दिवसात निष्पन्न झालेल्यांपैकी बहुतांश बाधित मुंबईहून गावी आले होते. त्यांना गावातच अथवा त्यांच्या राहत्या घरी विलगीकरणात ठेवण्यात आले होते. याच लोकांमध्ये बाधित निघण्याचे प्रमाण वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा झपाट्याने फुगत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
एक नजर जिल्ह्यातील एकूण परिस्थितीवर
* एकूण बाधित - 278
* उपचार घेत असलेले - 157
* उपचारांती बरे झालेले - 114
* अहवाल निगेटीव्ह आले - 4931
* कोरोनाचे बळी - 7