ETV Bharat / state

आज सातारा जिल्ह्यात 1 हजार 621 कोरोनाबाधितांची नोंद, 45 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आज काहीप्रमाणात घट झाली आहे. दुसरीकडे मात्र टक्केवारी वाढल्याचे आढळून येत आहे. गेल्या 24 तासांत 4 हजार 89 नमून्यांपैकी 1 हजार 621 नागरिकांचे नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत.

सातारा कोरोना अपडेट
सातारा कोरोना अपडेट
author img

By

Published : May 11, 2021, 10:43 PM IST

सातारा - जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आज काहीप्रमाणात घट झाली आहे. दुसरीकडे मात्र टक्केवारी वाढल्याचे आढळून येत आहे. गेल्या 24 तासांत 4 हजार 89 नमून्यांपैकी 1 हजार 621 नागरिकांचे नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत.

गेल्या चोवीस तासांत सातारा जिल्ह्यात एकूण 4 हजार 89 संशयितांचे नमूने घेण्यात आले. त्यापैकी एक हजार 621 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मंगळवारी दिवसभरात 45 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या व आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. सातारा 11 (857), फलटण 8 (218), वाई 6 (244) , कराड 6 (511), खटाव 3 (303), कोरेगांव 3 (266), माण 2 (165), जावली 2 (129), खंडाळा 2 (100), महाबळेश्वर 1 (39), पाटण 1 (130) आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 2 हजार 962 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सातारा, माण, फलटणमध्ये कोरोना रुग्ण वाढले

तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या आणि एकूण कोरोनाबाधितांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे सातारा 287 (28592), माण 234 (8514), फलटण 206 (16863), कराड 250 (18579), खटाव 172 (11103), जावळी 80 (6064), खंडाळा 82 (7805), कोरेगांव 78 (10757), महाबळेश्वर 23 (3568), पाटण 96 (5197), वाई 92 (9436 ) व इतर 21 (718) असे मिळून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 27 हजार 196 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.