ETV Bharat / state

साताऱ्यात खंडणीप्रकरणातील वनपाल गावितसह तीन वनरक्षक निलंबीत - सातारा खंडणी प्रकरणात वनरक्षक निलंबन बातमी

बोरगाव पोलिसांत खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वन विभागांतर्गत सहाय्यक वनसंरक्षकांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. त्यात फरार होणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, खात्याची प्रतिमा मलिन होईल, असे वर्तन करणे आदींचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्राथमिक चौकशीत ते दोषी आढल्याने गावितसह चौघांनाही निलंबीत करण्याचे आदेश डाॅ. हाडा यांनी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन यांच्या मान्यतेने आज काढले.

forest officer
वनपाल गावितसह तीन वनरक्षक निलंबीत
author img

By

Published : Sep 24, 2020, 10:12 PM IST

सातारा - तरुणाकडून २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणातील मुख्य संशयित, वनपाल योगेश गावीत व इतर तीन वनरक्षकांना आज निलंबीत करण्यात आले. सध्या हे चौघेही फरार आहेत. परळीचा वनपाल योगेश गावित, कुसवडे वनरक्षक महेश सोनावले, पळसावडे वनरक्षक रणजित काकडे, ठोसेघर वनरक्षक किशोर ढाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. लवकरच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा यांनी सांगितले.

ओंकार शिंदे (पिरेवाडी, भैरवगड ता.सातारा) हा नुकसान करणाऱ्या माकडांना हाकलण्यासाठी शेतात गेला होता. तेथे वनपाल योगेश गावित, वनरक्षक महेश सोनावलेसह चौघांनी त्याला पकडले. गावितने कारवाई न करण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली. अन्यथा तुझ्यावर प्राण्यांची शिकार करण्याचा गुन्हा दाखल करतो, असे धमकावले होते. २५ हजार रुपयांची खंडणी घेतल्यानंतर ओंकारची सुटका करण्यात आली, असे ओंकार शिंदे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. बोरगाव पोलिसांत खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वन विभागांतर्गत सहाय्यक वनसंरक्षकांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. त्यात फरार होणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, खात्याची प्रतिमा मलिन होईल, असे वर्तन करणे आदींचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्राथमिक चौकशीत ते दोषी आढल्याने गावितसह चौघांनाही निलंबीत करण्याचे आदेश डाॅ. हाडा यांनी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन यांच्या मान्यतेने आज काढले.

दोनच दिवसांपूर्वी खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल असलेला योगेश गावित व महेश सोनावले यांचा अटकपूर्व जामीनअर्ज येथील न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बोरगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डाॅ. सागर वाघ अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.