ETV Bharat / state

Thieves looted jewelery: चोरांनी बंद घरे फोडून लंपास केले २२ तोळ्याचे दागिने - चोरांनी दागिने लुटले

मागील दोन दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. उपनगरातील बंद घरे फोडून (breaking into locked houses) तसेच दागिने पॉलिशच्या बहाण्याने (theft under pretext of polishing) एकूण २२ तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केले (Thieves looted jewelery) आहेत. चोरट्यांनी महिलेची नजर चुकवून सोन्याच्या दागिन्यांसह तेथून पोबारा केला. याप्रकरणी सुनीता भागवत यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Thieves looted jewelery
चोरांनी लंपास केले दागिने
author img

By

Published : Dec 14, 2022, 3:59 PM IST

सातारा: सातारा शहरातील गोडोली, कोडोली आणि सदर बझार परिसरात चोरट्यांनी मागील दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. उपनगरातील बंद घरे फोडून (breaking into locked houses) चोरट्यांनी दागिने लंपास (Thieves looted jewelery) केले आहेत. तसेच दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने (theft under pretext of polishing) कोरेगावातील एका महिलेचे तब्बल ११ तोळ्याचे दागिने लांबविले आहे. (Latest news from Satara) विविध घटनांमध्ये चोरट्यांनी २२ तोळे दागिन्यांवर हात मारला आहे. (Satara Crime)

प्लॅट फोडला : सासरे दवाखान्यात अ‍ॅँडमिट असल्याने सदर बझारच्या कांगा कॉलनीतील प्रियांका लाड या आपल्या कुटुंबासह दवाखान्यात गेल्या होत्या. ही संधी साधत चोरट्यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास घरातील ८ तोळ्यांचे दागिने आणि रोकड लंपास केली. दुपारी साडे बाराच्या सुमारास घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी प्रियांका लाड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दागिने लंपास : कोरेगावमधील शिवाजीनगरमध्ये राहणार्‍या सुनीता हणमंत भागवत यांचे ११ तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लांबवले. सुनीता भागवत घरात एकट्या असताना दोन अनोळखी इसम घरी आले. आम्ही सोन्याचे दागिने चांगल्या प्रकारे उजळून देतो, असे सांगितले. त्यांच्या बोलण्याला भाळून सुनीता यांनी दागिने पॉलिश करण्यासाठी आणून दिले. चोरट्यांनी महिलेची नजर चुकवून सोन्याच्या दागिन्यांसह तेथून पोबारा केला. याप्रकरणी सुनीता भागवत यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घटनास्थळी येऊन घटनेची माहिती घेत तपासाच्या सूचना केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.