सातारा: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ये (ता.सातारा) येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि. २३) लग्नसोहळा होता. लग्नसोहळा पार पडल्यानंतर वधूच्या खोलीतील दागिन्यांची पिशवी गायब झाल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मंगल कार्यालयात गोंधळ उडाला.
रोकड, आहेराच्या पाकिटांसह ऐवज लंपास: चोरट्याने लांबवलेल्या पिशवीत साडेसात ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, दीड तोळ्याचे मंगळसूत्र, अडीच तोळ्यांचे चार सोन्याचे क्वॉइन, चांदीची मूर्ती, चांदीच्या पैंजणांचे पाच जोड, ५० हजारांची रोकड आणि ५० हजार रुपयांची आहेराची पाकिटे, असा सुमारे ३ लाख १४ हजारांचा ऐवज होता.
अज्ञातावर गुन्हा दाखल: या घटनेनंतर नातेवाइकांनी मंगल कार्यालयात चोरट्याचा शोध घेतला. मात्र, चोरटा सापडला नाही. याप्रकरणी मीना शिंदे (रा. कोडोली, ता. सातारा) यांनी सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार कुमठेकर अधिक तपास करीत आहेत.
सुक्या मेव्यावरच डल्ला: चोरीच्या अनेक घटना घडत असतात. कधी सोनं तर कधी पैशांची चोरी केली जाते. मात्र, शहरात झालेली एक चोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, यात कोणत्या मौल्यवान वस्तूंची नाही तर चक्क सुक्या मेव्याची चोरी झाली आहे. शहागंज भागात झालेल्या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी 16 किलो काजू आणि दहा किलो बदामावर हात साफ केला. हा सर्व प्रकार 'सीसीटीव्ही'मध्ये कैद झाला आहे.
चोरीची तक्रार दाखल: या प्रकारात दुकानदार मोहम्मद अब्दुल सलाम सकाळी दहा वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे वरचे पत्रे उचकटलेले दिसले. दुकानात जाऊन पाहणी केली असता काजूची व बदामांची पाकिटे कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाहणी केली असता एकूण 18 हजार 450 रुपयांचे काजू व बदामावर चोरट्याने ताव मारल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली.
हेही वाचा: