ETV Bharat / state

साताऱ्यात ज्वेलर्स दुकानात चोरी; लाखो रुपयांची बॅग लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

पाटणमधील विनायक ज्वेलर्स या दुकानामध्ये दिवसाढवळ्या चोरी करण्यात आली. चोरट्याने 1 लाख 20 हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि 30 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली.

Theft in jeweler's shop at Patan
पाटण येथे ज्वेलर्सच्या दुकानात चोरी
author img

By

Published : Jan 14, 2020, 1:03 PM IST

सातारा - पाटणमधील विनायक ज्वेलर्स या दुकानांमधून दिवसाढवळ्या चोरी करण्यात आली. चोरट्याने 1 लाख 20 हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि 30 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरली. दुकानात कोणी नसल्याचा फायदा घेत ही चोरी झाली. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दुकान मालक अंकुश बाबुराव पिसाळ यांनी पाटण पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे.

साताऱ्यातील पाटण येथे ज्वेलर्सच्या दुकानात चोरी

हेही वाचा... 'आज के शिवाजी'...काँग्रेस आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन पुकारणार

या चोरीमुळे बाजारपेठेत एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणमधील झेंडाचौकात अगदी वर्दळीच्या ठिकाणी अंकुश पिसाळ यांचे विनायक ज्वेलर्स हे दुकान आहे. यापूर्वीही दुकानात चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे पिसाळ हे सुरक्षिततेसाठी नेहमीच दुकान बंद करताना दुकानातील दागिने आणि रोख रक्कम एका बॅगेत भरून घरी नेतात. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी सोन्याचे दागिने तिजोरीत ठेवून उर्वरीत चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग घेऊन ते घरी गेले होते.

हेही वाचा... 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाचा वाद, हिंगोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध

सोमवारी (दि. 13) रोजी सकाळी ते दागिन्यांची आणि रोख रक्कम असलेली बॅग घेऊन दुकानात आले. दुकान उघडल्यानंतर ती बॅग त्यांनी काउंटरजवळ ठेवली आणि पाणी आणण्यासाठी रस्त्याच्या पलिकडे गेले होते. याच वेळेचा फायदा घेत चोरट्याने दुकानातील बॅग घेतली आणि तो पसार झाला. काही वेळानंतर अंकुश पिसाळ दुकानात आल्यावर दुकानातील बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला असता, त्यांना जॅकेट घातलेला युवक बॅग घेऊन गेल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती पाटण पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत चोरीचा पंचनामा केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अज्ञात युवकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Intro:सातारा पाटणमधील विनायक ज्वेलर्स या दुकानामधून दिवसाढवळ्या 1 लाख 20 हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि 30 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने दुकानात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत गायब केल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. चोरीची सर्व घटना दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चोरीची फिर्याद दुकान मालक अंकुश बाबुराव पिसाळ यांनी पाटण पोलिसात दिली आहे. दरम्यान, ज्वेलर्स दुकानावर दोन-तीन दिवसापासून वॉच ठेवूनच चोरट्याने ही चोरी केली असल्याची चर्चा परिसरात आहे. या चोरीमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
Body:याबाबत घटनास्थळावरून आणि पाटण पोेलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पाटणमधील झेंडाचौकात अगदी वर्दळीच्या ठिकाणी अंकुश बाबुराव पिसाळ यांच्या मालकीचे विनायक ज्वेलर्स हे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. यापूर्वीही या दुकानात चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे दुकान मालक हे सुरक्षिततेच्या कारणास्तव दररोज नेहमी दुकान बंद करताना दुकानातील दागिणे व रोख रक्कम एका बॅगमधून आपल्या सोबत घरी घेवून जात असत. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी सोन्याचे दागिने तिजोरीत ठेवून उर्वरीत चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग घेवून ते दुकान बंद करून ते घरी गेले होते.
सोमवार दि. 13 रोजी सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते दागिन्यांची आणि रोख रक्कम असलेली बॅग घेवून दुकानात आले. दुकान उघडल्यानंतर ती बॅग त्यांनी काउंटरच्या खालील बाजूस ठेवूने ते पाणी आणण्यासाठी रस्त्याच्या पलिकडे असणाऱ्या दुकानात गेले होते. या वेळेचा फायदा घेत चोरट्याने दुकानातील ती बॅग घेवून तो पसार झाला. काही वेळेनंतर दुकान मालक अंकुश पिसाळ हे दुकानात आल्यावर दुकानातील बॅग चोरीला गेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी दुकानातील सीसीटिव्ही कॅमेरा पाहिला असता जॅकेट घातलेला युवक ती बॅग घेवून गेल्याचे निदर्शनास आले. त्या बॅगेत 1 लाख 20 हजार रुपयांचे 3 किलो 800 ग्रॅम चांदीचे दागिने (95 लहान-मोठ्या आकाराचे पैंजन) आणि 30 हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज होता. याबाबतची माहिती पाटण पोलिसांना दिल्यानंतर पाटण पोलिसांनी घटनास्थळी येवून चोरीचा पंचनामा केला. सदर सीसीटिव्ही कॅमेरा पाहिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात युवकावर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.

Conclusion:सीसीटिव्हीत त्या युवकाचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने पाटण पोलिसांच्यापुढे त्या युवकाला शोधून काढण्याचे आवाहन निर्माण झाले आहे. दरम्यान, दुकानाचे मालक काही वेळेसाठी दुकानातून बाहेर गेल्यानंतर थोड्या वेळाचा फायदा घेत चोराने आपला डाव साधला. त्यामुळे साधारणत: चोरी करण्यापूर्वी चोरट्याने दोन ते तीन दिवसांपासून दुकानाची टेहाळणी करूनच चोरी केली असावी अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. सीसीटिव्हीतील चित्राद्वारे पाटण पोलिसांनी तपास यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. याचा अधिक तपास सपोनि तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली के. आर. खांडे करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.