ETV Bharat / state

Shambhuraj Desai : अवैध बांधकाम केल्याचा आरोपांवर मंत्री शंभूराज देसाईंच्या मोठा खुलासा ... - Illegal construction in Mahabaleshwar

मंत्री शंभूराज देसाईंनी ( Minister Shambhuraj Desai ) परवानगी न घेता महाबळेश्वर येथील इकोसेन्सेटिव्ह झोनमधील जमिनीवर घराचे अवैध बांधकाम केल्याचा ( Illegal construction in Mahabaleshwar )आरोप ठाकरे गटाने ( Thackeray group accuse on minister Shambhuraj Desai ) केला आहे. शपथपत्रात बांधकामाचा उल्लेख केला आहे. मात्र, सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाची नोंद नसल्याची बाब ठाकरे गटाने समोर आणली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही म्हणून हा आरोप खोटा आहे. निवडणूकीच्या शपथपत्रात मी हे नमूद केले आहे.

Shambhuraj Desai
शंभूराज देसाई
author img

By

Published : Dec 27, 2022, 3:53 PM IST

Updated : Dec 27, 2022, 6:26 PM IST

मंत्री शंभूराज देसाई माध्यमांसोबत बोलताना

सातारा : कृषीमंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ), मंत्री संजय राठोड ( Minister Sanjay Rathod ) यांच्यानंतर विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाने शिंदे गटातील आणखी एका मंत्र्याला लक्ष्य केले आहे. मंत्री शंभूराज देसाईंनी परवानगी न घेता महाबळेश्वर येथील इकोसेन्सेटिव्ह झोनमधील जमिनीवर घराचे अवैध बांधकाम ( Illegal construction in Mahabaleshwar ) केल्याचा आरोप ठाकरे गटाने ( Thackeray group accuse on minister Shambhuraj Desai ) केला आहे. यासंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंनी खुलासा केला आहे.

मंत्री शंभूराज देसाईंचा खुलासा : मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही म्हणून हा आरोप खोटा आहे. निवडणूकीच्या शपथपत्रात मी हे नमूद केले आहे. ग्रामपंचायतीतील हद्दीतील ती जमीन आहे. ग्रामपंचायतीचा उतारा माझ्याकडे आहे यासाठी मी त्या जागेची घरपट्टी देखील भरतो. या जमिनीच्या चौकशीला सामोरो जाण्याची माझी तयारी आहे. व मी चौकशीला पूर्णपणे सहकार्य करेल.

अनिल परबांवर टीकास्त्र : मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, मी समुद्रकिनारी घर बांधणारा नाही. न्यायालयाने आदेश देऊनही अनिल परब यांनी दुसऱ्यांवर आरोप करू नये. तसेच अनिल परब यांनी माझ्यावर केलेले आरोप मागे घेतले नाहीत तर मी पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल असा इशारा मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आहे.

शंभूराज देसाईंच्या अडचणी वाढणार? : दोन मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर ठाकरे गटाने उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना लक्ष्य केले आहे. शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वर जवळील नावली येथील गट क्रमांक-24 मधील शेत जमिनीवर अवैध बांधकाम केले असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ही जमीन इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असून तेथे बांधकामाला परवानगी नाही, असे असताना परवानगी न घेता बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सातबाऱ्यावर नोंद नाही : निवडणूक शपथपत्रात महाबळेश्वरमधील जागेवर घराचे बांधकाम असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाची नोंद नसल्याची बाब ठाकरे गटाने समोर आणली आहे. अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी देखील ठाकरे गटाने केली आहे. यामुळे मंत्री शंभूराज देसाईंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मंत्र्यांवर गंभीर आरोप : विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सत्तारांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचे एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप झाला आहे. यावरून अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Last Updated : Dec 27, 2022, 6:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.