कराड (सातारा) - पाटण तालुक्यात कोयना धरण परिसरातील भूस्खलनग्रस्त आंबेघर, मिरगाव, हुंबरळी गावातील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या क्वॉर्टसमध्ये करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. भूस्खलनग्रस्त गावांची एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यानंतर कोयनानगरमधील जलसंपदा विभागाच्या निवासी वसाहतींचीही त्यांनी पाहणी केली. वसाहतींच्या डागडुजीचे काम वेगाने पूर्ण करून 150 कुटुंबांचे स्थलांतर त्याठिकाणी करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
बाधित नागरिकांना चादरी, कपड्यांचे वाटप-
कोयनानगर परिसरातील आंबेघर, मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे या गावांमध्ये झालेल्या भूस्खलनात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भूस्खलनग्रस्त गावांची पाहणी केली. बाधितांचे एमटीडीसीच्या पर्यटन रिसॉर्ट आणि कोयनानगर जिल्हा परिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. निवारा छावणीला भेट देऊन ना. शिंदे यांनी ग्रामस्थांना दिलासा दिला. आपत्तीच्या प्रसंगात शासन तुमच्यासोबत आहे. पुनर्वसनाबाबत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काला जाईल, अशी ग्वाही त्यांनी बाधितांना दिली. त्याचबरोबर चादरी, कपडे, सतरंज्या, चटया, छत्र्या, अशा जीवनावश्यक वस्तुंची देखील मदत त्यांनी दिली.
बाधितांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाचा पर्याय-
विभागाच्या वसाहतीत तात्पुरते पुनर्वसन करण्याचा पर्याय पुढे आला. कोयनानगर परिसरातील या वसाहती कोयना धरणाच्या उभारणीवेळी बांधण्यात आल्या होत्या. या वसाहतींची डागडुजी केल्यास बाधितांच्या पुनर्वसनासाठी तो एक चांगला पर्याय ठरू शकेल, यावर सर्वांचे एकमत एकमत झाले. त्यामुळे नामदार एकनाथ शिंदे यांनी शासकीय वसाहतींच्या डागडुजीचे काम तातडीने पूर्ण करून भूस्खलनग्रस्त गावांचे पुनर्वसन करावी, अशा सूचना प्रशासनला केल्या. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ठाण्याचे नगरसेवक राम रेपाळे, योगेश जानकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
भूस्खलनग्रस्तांचे जलसंपदा विभागाच्या वसाहतींमध्ये तात्पुरते पुनर्वसन करा; एकनाथ शिंदेंचे निर्देश - कोयनानगर जिल्हा परिषद
कोयनानगर परिसरातील आंबेघर, मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे या गावांमध्ये झालेल्या भूस्खलनात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भूस्खलनग्रस्त गावांची पाहणी केली. बाधितांचे एमटीडीसीच्या पर्यटन रिसॉर्ट आणि कोयनानगर जिल्हा परिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे.