ETV Bharat / state

Human Trafficking : अनैतिक व्यापारातील मानवी तस्करीचा तेलंगणा पोलिसांनी 'असा' केला पर्दाफाश; वाचा सविस्तर..

author img

By

Published : Jul 23, 2022, 10:59 PM IST

ब्युटी पार्लरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने दोन बांगलादेशी तरूणींना पश्चिम बंगालमार्गे मुंबई, हैदराबादमध्ये आणून वेश्या व्यवसायात ढकलणार्‍या टोळीच्या रचकोंडा पोलिसांनी मुसक्या ( Human Trafficking ) आवळल्या. 'तुमच्यासाठी..तुमच्या बरोबर..' हे ब्रीद सार्थ ठरविल्याने रचकोंडा पोलीस कौतुकास पात्र ठरले आहेत.

Human Trafficking
तेलंगणा पोलीस

सातारा - ब्युटी पार्लरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने दोन बांगलादेशी तरूणींना पश्चिम बंगालमार्गे मुंबई, हैदराबादमध्ये आणून वेश्या व्यवसायात ढकलणार्‍या टोळीच्या रचकोंडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याने तिच्या बहिणीने तस्करांशी भांडण केले आणि लहान बाळाला घेऊन बाजारात गेली. रस्त्यावर रडत उभी असताना ती पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी तिची विचारपूस केल्यानंतर आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आणि सहा जण गजाआड गेले.

पोलीस आयुक्त महेश भागवत यांची प्रतिक्रिया

पोलीस आयुक्तांनी सांगितले - तेलंगणातील रचाकोंडा पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतील उप्पल पोलीस ( Uppal Police in Karad ) ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता मुलींच्या शोधासाठी तेलंगणाचे पोलीस बुधवारी साताऱ्यातील कराडमध्ये दाखल झाले. कराड शहर पोलीस ठाण्यातील बंदोबस्त घेऊन त्यांनी पुणे -बंगळुरू महामार्गावरील हॉटेल नवरंगवर छापा मारला. हॉटेलच्या लॉजवर त्यांना अल्पवयीन बांगलादेशी मुलगी सापडली. पोलिसांनी तिच्यासह लॉजमधील तिघांना ताब्यात घेतले. तत्पुर्वी तेलंगणा पोलिसांनी राजस्थान तसेच मुंबईतदेखील छापे मारून संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती ही रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिली आहे.

पीडितेच्या तक्रारीनंतर गतीने झाला तपास - उप्पल (तेलंगणा) पोलीस ठाण्यात दि. 11 जुलै रोजी पीडित बांगलादेशी तरूणीने तक्रार नोंदवली. त्यामुळे देशभरात ऑनलाईन मानवी तस्करीचे रॅकेट कार्यरत असल्याचा प्रकार उघडकीस आला. रचकोंडा पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राजस्थान, झारखंडसह महाराष्ट्रातील मुंबई आणि सातारा जिल्ह्यात छापे टाकून अनैतिक व्यापारासाठी मानवी तस्करी करणार्‍या 8 जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला. फिर्यादी तरूणीने आपली लहान बहिण सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये असल्याचे सांगितले. त्यामुळे रचकोंडा पोलीस कराडमध्ये दाखल झाले. कराडमधील नवरंग लॉजवर छापा मारून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका केली. तसेच लॉज मालक, व्यवस्थापक आणि कामगाराला अटक केली. मानवी तस्करीच्या रॅकेटमधील सतीश रजक (झारखंड), वृष्टी खातून (बांगलादेश), दीपक चंद (राजस्थान), सुरेश बाळू सोनावणे, अस्लम चांद पटेल, अरुण रामचंद्र जाधव (रा. कराड, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे, तर कुमावथ प्रकाश (राजस्थान) आणि प्रियांका (पश्चिम बंगाल) हे दोन संशयीत फरार आहेत. अटक केलेल्या संशयितांवर फसवणूक, पिटा कायद्यासह पोक्सो, बलात्काराच्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून स्फ्टि कार, मोबाईल फोन, सिमकार्ड आणि बनावट ओळखपत्रे देखील जप्त केली आहेत.

ब्युटी पार्लरमध्ये नोकरीच्या बहाण्याने मुलींची तस्करी - ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने बांगलादेशी तरूणींना कोलकातामार्गे भारतात आणून देशाच्या विविध भागात ऑनलाईन मानवी तस्करीचे रॅकेट चालवले जात होते. आंतरराज्य मानवी तस्करी टोळी अनेक राज्यांतील महिला आणि तरुणींना विकत घेऊन वेश्या व्यवसायासाठी तस्करांना पुरवत होते. राजस्थानमधील दीपक चंद आणि झारखंडचा सतीश रजक हे तस्कर अनेक वर्षांपासून मानवी तस्करीच्या व्यवसायात कार्यरत आहेत. महिला आणि तरूणींकडून वेश्या व्यवसाय चालवून अवैध मार्गाने ते पैसे कमवत होते. या तस्करांनी ऑनलाईन डेटिंग वेबसाईट तयार केली होती. त्यावर महिला आणि मुलींचे अर्धनग्न फोटो अपलोड करून तस्करांना आणि त्यांच्या ग्राहकांना महिला, तरूणी पुरवल्या जात होत्या. फ्लाइट, ट्रेन आणि बसच्या तिकिटांची व्यवस्था केली जात होती. नेट बॅकिंगच्या माध्यमातून ते अर्थिक व्यवहार करत होते.

महिला तस्करांकडून बांगलादेशी मुलींना मागणी - अनैतिक व्यापारातील महिला तस्करांकडून बांगलादेशी मुलींना मोठी मागणी होती. त्यामुळे या व्यवसायातील तस्करांशी संपर्कात राहून महिला तस्कर बांगलादेशी मुलींची मागणी करायच्या. बांगलादेशी मुलींना इकडच्या भाषा समजत नसल्याने महिला तस्करांना वेश्या व्यवसाय बिनदिक्कतपणे चालविता येत होता. तसेच त्या मुली बांगलादेशी असल्याने त्यांची स्थानिक ग्राहकांशी जुनी ओळख अथवा संपर्क नसे.

कराडमध्ये अनैतिक व्यापार फोफावला - सुसंस्कृत आणि निसर्गरम्य म्हणून ओळख असणार्‍या सातारा जिल्ह्यातील कराडसारख्या सर्वांगाने पुढारलेल्या तालुक्यात सध्या अनैतिक व्यापार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. कराड शहराच्या चारी बाजूला असणार्‍या राष्ट्रीय आणि राज्यमार्गावर ठराविक अंतरावर लॉज पाहायला मिळतात. परंतु, पोलिसांकडून कधीही लॉजवर छापे मारून सर्च ऑपरेशन राबविले जात नाही. त्यामुळे सातार्‍यातील अनैतिक व्यापाराला मोठे बळ मिळताना दिसत आहे. तेलंगणा पोलिसांच्या कारवाईनंतर सातारा जिल्ह्यात मानवी तस्करीतून आणलेल्या मुलीकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सातारा पोलीस दलाची मोठी नाचक्की झाली आहे.

ब्युटी पार्लरमध्ये नोकरीच्या बहाण्याने मुलींची तस्करी - रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत, अतिरिक्त पोलीस आयुक्त जी. सुधीर बाबू, उपायुक्त रक्षिता के. मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी तस्करीच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. या पथकाने तीन राज्यात छापे मारून संशयितांना गजाआड केले. मलकाजगिरी झोनचे उपायुक्त के. मुरलीधर, सहाय्यक आयुक्त डी. व्यंकण्णा नाईक, एन. नरेश रेड्डी, पोलीस निरीक्षक जी. नवीन कुमार, उप्पल पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. गोविंदा रेड्डी, जी. बालकृष्णा, उपनिरीक्षक एन. सुधाकर रेड्डी, व्ही. रमेश आणि पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकाने हे ऑपरेशन राबवले. 'तुमच्यासाठी..तुमच्या बरोबर..' हे ब्रीद सार्थ ठरविल्याने रचकोंडा पोलीस कौतुकास पात्र ठरले आहेत.

हेही वाचा - Illegal Bar In Goa : गोवा काँग्रेसचा स्मृती इराणींवर गंभीर आरोप; 'मृत व्यक्तीच्या नावावर रेस्टाँरंट'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.