ETV Bharat / state

Teacher Society Elections : कराड-पाटण शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, गुरूमाऊली पॅनेलचे दोन उमेदवार बिनविरोध - शिक्षक सोसायटीच्या निवडणुकी

सातारा जिल्ह्यातील कराड-पाटण शिक्षक सोसायटीच्या निवडणुकांचा प्रचार सुरू (Teacher Society elections in Karad Patan Taluka) आहे. गुरूमाऊली व गुरूजन पॅनेलचा जोरदार प्रचार, आरोप प्रत्यारोप पाहावयास मिळत आहे. रविवारी मतदान आणि २ जानेवारीला निकाल जाहीर होणार (Gurujan and Gurumauli Panel Campaign) आहे.

Teacher Society Elections
शिक्षक सोसायटी निवडणुक
author img

By

Published : Dec 31, 2022, 12:52 PM IST

प्रतिक्रिया देताना महेंद्र जानुगडे, श्री गुरूमाऊली पॅनेलप्रमुख

सातारा : सातारा जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या कराड-पाटण तालुका शिक्षक सोसायटीच्या (Teacher Society Elections ) प्रचारात गुरूजन आणि गुरूमाऊली पॅनेलमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गुरूमाऊली पॅनेलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर गुरूजन पॅनेलने प्रचाराचा शुभारंभ चक्क कराडच्या प्रीतिसंगम बागेत केल्यामुळे पॅनेलचे नेते अडचणीत आलेे आहेत. रिटायर्ड होऊनसुध्दा गुरूजन पॅनेलच्या नेत्यांचा जीव शिक्षक सोसायटीत का गुंतलाय ? आठ वर्षात 23 चेअरमन का आणि कसे झाले ? असे सवाल करत गुरूमाऊली पॅनेलने विरोधी पॅनेलची कोंडी केली (Gurujan and Gurumauli Panel Campaign) आहे.

चेअरमनपदासाठी राजकारण : आठ वर्षात 23 चेअरमन केल्याचा आरोप गुरूजन पॅनेलने केला आहे. त्यावर बोलताना गुरूमाऊली पॅनेलचे प्रमुख महेंद्र जानुगडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 23 चेअरमन करणारेच आमच्या विरोधी पॅनेलचे प्रमुख आहेत. त्यामुळे आरोप करणार्‍यांनी त्यांच्या पॅनेल प्रमुखांनाच विचारावे. पहिले दोन-तीन चेअरमन सोडले तर प्रत्येक चेअरमन कसा झाला ? का झाला ? कोणत्या रूपाने झाला ? पाकिटातून नावे कशी गेली ? पाकिट कसे कुणापर्यंत पोहोचले ? या सर्व गोष्टी सभासदांना ज्ञात (Teacher Society elections in Karad Patan Taluka) आहेत.

संचालक मंडळाने काय केले : शिक्षकांचे दैवत माजी आमदार दिवंगत शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील निवडणुकीत जिल्ह्यातील शिक्षक संघाचे सर्व कार्यकर्ते एकत्र आले. शिवाजीराव पाटील यांच्या नावाच्या पॅनेलमधून मागील निवडणुकीत सर्वजण निवडून आले होते. या निवडणुकीत जिल्ह्यातील शिक्षक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ताकदीवर ही निवडणूक देखील आम्हीच जिंकू. मागील संचालक मंडळाने मयत सभासदांना 2 लाखांची मदत तसेच फक्त 7 टक्के दराने शैक्षणिक कर्ज दिले. मग या संचालक मंडळाने नेमके वाईट काम काय केले, असा सवाल महेंद्र जानुगडे यांनी गुरूजन पॅनेलला केला (Teacher Society Elections Campaign) आहे.

नक्की जीव कशात गुंतलाय? संचालक मंडळाने भ्रष्टाचार केला, असे जर विरोधी पॅनेलप्रमुख म्हणत असतील तर तेच संस्था चालवत होते. मग तुम्हीच भ्रष्टाचार केला असे म्हणायचे का? आरोप करणारे संस्थेचे विद्यमान चेअरमन आहेत. भ्रष्टाचाराला थांबवू या, असे जर तेच जर म्हणत असतील तर त्यांनी भ्रष्टाचार केला का ? हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. सेवानिवृत्त झाले असले तरी गुरूजन पॅनेलच्या नेत्यांचा आत्मा संस्थेतून निघेना. त्यांचा जीव नक्की कशात गुंतलाय आणि कशात अडकला आहे ? असा उपरोधिक सवालही महेंद्र जानुगडे यांनी (Teacher Society Elections Campaign in Satara) केला.

यापुढेही निलंबित होईन : शिक्षकांच्या हितासाठी अधिकार्‍यांशी संघर्ष केल्यामुळे माझे 18 वर्षापुर्वी निलंबन झाले होते. त्या निलंबनाचा देखील मला अभिमान आहे. कारण, शिक्षकांच्या हितासाठी ते निलंबन मी करून घेतले होते. यापुढेही शिक्षकांच्या हितासाठी अधिकार्‍यांशी संघर्ष करण्याची तयारी ठेवलेली आहे. संस्थेत भरती करताना कोणाला कुठे पैसे मागितले, हा इतिहास देखील आम्हाला माहित आहे. मी खरे बोलतो आणि खरे वागतो म्हणून शिक्षक आमच्या सोबत आहेत, असा विश्वास महेंद्र जानुगडे यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.