सातारा - मायणी येथील वाळू तस्करांवर धडक कारवाई करून तब्बल एक कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांवर पोलिसांनी जरब बसवला आहे. या विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख विभाग सातारा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागाने खटाव तालुक्यातील मायणी येथे वाळूतस्करांविरुद्ध धडक कारवाई केली. यात डंपर, चार चाकी, गाड्या, दुचाकी, विविध कंपन्यांचे मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १ कोटी ४ लाख ६६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल वाळू तस्करांकडून जप्त करण्यात आला आहे. यात सहा जणांना अटक करण्यात आली. तर मायणी येथील पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पवन वसंत पवार ( वय २९) ता. कडेगाव, मदार मिरासाहेब शेख (वय२८ ) कडेगाव, बापुसो ज्ञानदेव गायकवाड (वय ५० ) वडियेरायबाग ता. कडेगाव, सुनील नेताजी साळुंखे (वय२७) कुंभारगाव ता. पाटण, राजेश गंगाराम मस्के (वय३०) खंबाळे. ता. खानापूर, सचिन तातोबा माने (वय२१) नांदलापूर. ता. कराड. हे आहेत. तर संभाजी राजाराम देशमुख, सनी शिवाजी मदने, सागर पाटोळे, हिम्मत देशमुख, पिंटू गायकवाड, सुरज सोपान जाधव सर्व राहणार मायणी ता. खटाव हे आरोपी पळण्यात यशस्वी झाले.