सातारा- जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून भारतातही त्याचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे केंद्र तेसेच राज्य शासन, प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यातच सातारा शहरात बाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण सातारा शहरासह परिसरातील 9 ग्रामपंचायती व त्रिशंकू क्षेत्रावर प्रतिबंधात्मक कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मध्यरात्री 12 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
हेही वाचा- ...बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे!
सातारा शहर व त्रिशंखू भागासह खेड, विलासपूर, गोडोली, शाहूपुरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर या ग्रामपंचायतींचे क्षेत्र अनिश्चित काळासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशनुसार आता या क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.
काय आहेत निर्बंध...
• दवाखाने, हॉस्पीटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व दुकाने बंद राहतील.
• गॅस सिलेंडर घरपोच वितरण होईल.
• औषधे व दूधपुरवठा घरपोच होईल.
• शिवराज पंप, कदम पंप, केतन दोषी हे पेट्रोलपंप चालू राहतील.
• अत्यावश्यक सेवेसाठी इंधनपुरवठा होईल.
• अत्यावश्यक सेवेतील शासकीय कार्यालये चालू राहतील.
• शासन मान्य शिवभोजन थाळीची सुविधा चालू राहील.