ETV Bharat / state

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक

author img

By

Published : May 6, 2021, 5:49 PM IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. याचवेळी गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेर शेण्या जाळण्याचा प्रकार समोर आला आहे.

Stones were hurled at the NCP office over the issue of Maratha reservation
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक

सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर आज काही युवकांनी दोन मोटारीतून येऊन दगडफेक केली. याचवेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थाना बाहेर शेण्या जाळण्याचा प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर अज्ञात युवकांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोवई नाक्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे 'दौलत' हे निवासस्थान आहे. या निवासस्थानाबाहेर अज्ञात युवकांनी शेण्या जाळण्याचा स्टंट केला. त्यानंतर या युवकांनी पोलिस कवायत मैदान रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस भवन या इमारतीवर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनीही शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.

स्टंट असल्याचा आरोप -

दगडफेकीनंतर युवक मोटारीत बसून निघून गेले. या प्रकाराबाबत बोलताना राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील म्हणाले, "चार ते पाच युवक दोन मोटारीतून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी भवनमध्ये कर्मचारी उपस्थित होता. त्यातील तीन युवक गेट वरून आत आले. त्यांनी राष्ट्रवादी भवनच्या काचांवर दगडफेक केली. काही क्षणातच मोटारीत बसून हे युवक पसार झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून पोलिसांनी अधिक तपासासाठी ताब्यात घेतले असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर कोणीतरी केलेला हा स्टंट असल्याचा आरोप राजकुमार पाटील यांनी यावेळी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.