सातारा - संशोधकांच्या मते कोरोना आणि इतर संसर्गजन्य विषाणू 30 अंश सेल्सिअस तापमानात जिवंत राहत नाहीत. एसटी बसचे सामान्य तापमान 40 ते 610 अंश सेल्सिअस असते. त्यामुळे एसटी बसमध्ये कोरोना आणि इतर संसर्गजन्य विषाणुंचा संसर्ग होऊ शकत नाही. म्हणून प्रवाशांनी एसटीने प्रवास करून कोरोनामुक्त सेवेची संधी द्यावी, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना केले आहे.
हेही वाचा - साताऱ्यात आढळला कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण
राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांची बांधणी अॅल्युमिनियम धातुच्या पत्र्यापासून केलेली असते. हा पत्रा इतर पत्र्यांपेक्षा काही क्षणात जास्त गरम होतो. संशोधकांच्या मते कोरोना आणि इतर संसर्गजन्य विषाणू ३० अंश सेल्सिअस तापमानात जिवंत राहत नाहीत. कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूने जगभर थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधित संशयित रुग्ण आढळले आहेत. यामुळे शासनाने सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई केली आहे. फक्त रेल्वे आणि बससेवा सुरू राहणार आहेत.
हेही वाचा - कोरोनामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द
कोरोनामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अजिबात घाबरू नये. कारण, एसटी बसची बॉडी ही अॅल्युमिनियम या धातुच्या पत्र्यापासुन बनवलेली असते. अन्य धातूच्या पत्र्यांपेक्षा हा पत्रा काही क्षणात गरम होतो. एसटी बसचे सामान्य तापमान 40 ते 60 अंश सेल्सिअस असते. या तापमानात कोरोनाचा विषाणू अथवा इतर संसर्गजन्य विषाणुंचा संसर्ग होऊ शकत नाही. आणीबाणीच्या काळात एसटीने प्रवास करून कोरोनामुक्त सेवेची संधी द्या, असे आवाहन परिवहन विभागाने प्रवाशांना केले आहे.