ETV Bharat / state

कोणी कितीही मोठा असू दे सोडणार नाही - गृहराज्यमंत्री देसाई - satara latest news

शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलीस उपनिरिक्षकाच्या अंगावर धावून गेलेल्या म्हसवडच्या नगरसेवक अकिल काझीची पार्श्वभूमी तपासून कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
author img

By

Published : May 12, 2020, 2:03 PM IST

सातारा - कोणी कितीही मोठा असता तरी शासकीय कामात अडथळा किंवा शासकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. सोमवारी (दि. 11मे) म्हसवडच्या नगरसेवकाने पोलीस उपनिरीक्षकास अर्वाच्य भाषेत बोलत दमदाटी केली होती. याबाबत ते बोलत होते.

बोलताना गृहराज्यमंत्री देसाई

ते म्हणाले, म्हसवड नगरपालिकेतील नगरसेवक अकिल काझी याची पार्श्वभूमी तपासून त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकास दिले आहे. पोलिसांवर कोणी हल्ला करेल किंवा कोणत्याही शासकीय कामात अडथळा निर्माण करुन कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले.

काय आहे प्रकरण..?

कोरोनाच्या पाश्वभूमीवर म्हसवड नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरु आहे. यासाठी त्यांनी पोलिसांची मदतही घेतली आहे. सोमवारी (दि. 11मे) कारावाईवेळी नगरसेक अकिल काझी हाच विनामास्क फिरत होता. यासाठी उपनिरीक्षक अमोल कदम यांनी नगरसेवकावरही दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना नगरपालिसकेच्या पथकाला दिल्या. यावरून चिडलेल्या नगरसेवक काझीने अर्वाच्य भाषेत बोलत उपनिरिक्षकाच्या अंगावर धावून दमदाटी केली. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नगरसेवक अकिल काझीविरोधात दाखल झाला आहे.

हेही वाचा - पोलीस उपनिरीक्षकाशी वाद घालणाऱ्या आमदार गोरे गटाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.