ETV Bharat / state

ST Bus Half ticket for Woman: राज्यात खरेच महिलांना मिळतोय का अर्ध्या तिकीटात एसटी प्रवास? वाचा, सविस्तर - अर्ध्या तिकीटात एसटी प्रवास

एसटी तिकीट दरातील ५० टक्के सवलतीच्या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या सवलतीमुळे महिलांमध्ये आनंदाने वातावरण आहे. तथापि, संगणकीय आणि ऑनलाईन तिकीटावर आरक्षण, आकार तसेच वातानुकुलित सेवांकरीता वस्तू व सेवाकर द्यावा लागणार आहे. त्यामुळे राज्यात खरंच महिलांना अर्ध्या तिकीटात एसटी प्रवास मिळतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ST Bus Half ticket for Woman
महिलांसाठी एसटी बसचे अर्धे तिकीट
author img

By

Published : Mar 19, 2023, 9:31 AM IST

प्रतिक्रिया देताना कराड आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ

सातारा : महिलांसाठी एसटी तिकीट दरातील ५० टक्के सवलतीमुळे महिला वर्गात आनंदाने वातावरण पाहावयास मिळत आहे. एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ही सवलत ही देखील महिलांना समाधान देणारी बाब आहे. या सवलतीमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ होणार आहे. संगणकीय अथवा ऑनलाईन आरक्षणाव्दारे तिकीट घेतील. प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार द्यावा लागणार आहे. तसेच प्रवास भाड्यातील अपघात सहाय्यता निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तू, सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी, असे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे. राज्याच्या बाहेर एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांनादेखील या तिकीट सवलतीचा फायदा मिळणार नाही.

सवलत रकमेचे होणार लेखापरीक्षण : सवलतीपोटी शासनाकडून महामंडळास मिळणारी रक्कम मोठी असणार आहे. त्या रकमेचा कोणत्याही स्तरावर गैरवापर होऊ नये आणि महामंडळास शासनाकडून प्रतिपुर्ती अचूक मिळावी, यासाठी आगार लेखाकारांनी त्याचे लेखापरीक्षण करावयाचे आहे. महिला सवलतीच्या संदर्भात हिशोब, तपासणी, लेखापरीक्षण, याबाबतच्या सुचना स्वतंत्र परिपत्रकाव्दारे निर्गमित केल्या जाणार आहेत.

एका वेळेस एकाच सवलतीचा लाभ : महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना एका वेळेस एकाच सवलतीचा लाभ घेता येतो. त्यामुळे पासधारक विद्यार्थिनींना एका वेळी फक्त एकाच योजनेतील सवलतीचा लाभ घेता येईल. अर्थात मासिक, त्रैमासिक पास अथवा महिला सन्मान योजनेंतर्गत ५० टक्के सवलतीत प्रवास करता येईल. दिव्यांग प्रवाशांना एसटी भाड्यात ७५ टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे महिला वर्गातील दिव्यांग प्रवाशांना प्रवास भाड्यात तीच सवलत अनुज्ञेय करण्यात येईल. महिला सन्मान योजनेअंतर्गत अतिरिक्त ५० टक्के सवलत मिळणार नाही. तसेच साडे तीन ते बारा वर्षे वयोगटातील मुलींना महिला सन्मान योजनेंतर्गत अतिरिक्त ५० टक्के सवलत देण्यात येणार नाही.

बृहन्मुंबई बससेवेला सवलत लागू : बृहन्मुंबई ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या बससेवेला महिला सन्मान योजनेंतर्गत सवलत लागू आहे. मात्र, रत्नागिरी व सांगली एसटी आगारामार्फत सुरू असलेल्या शहर वाहतूक (सिटी बस) सेवेला ५० टक्के सवलत लागू राहणार नाही. तसेच आवडेल तेथे प्रवास या योजनेतील पास सवलतीच्या दरानेच देण्यात येतात. त्यामुळे या योजनेला देखील सवलत मिळणार नाही. जास्तीत जास्त महिलांनी या सवलतीचा फायदा घेण्याचे आवाहन कराड आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ यांनी केले आहे.

हेही वाचा : Maharashtra Budget 2023 : आता एसटीने कधीही कुठेही फिरा फक्त हाफ तिकीटामध्ये; महिलांसाठी खास घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.