कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील दुसाळे गावातील जवान आणि १११ इंजिनियर रेजिमेंटचे नायक सचिन संभाजी जाधव यांना लेह-लडाख सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने आज रात्री दहा वाजता पुणे विमानतळावर येणार आहे. शनिवारी सकाळी दुसाळे (ता. पाटण) या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकार्यांनी दिली. दुसाळेचा जवान हुतात्मा झाल्याची वार्ता समजताज तारळे परिसरावर शोककळा पसरली.
हेही वाचा - दरोडेखोर आले शरण अन् टळला एन्काऊंटर, कराडच्या विद्यानगरने अनुभवला थरार...
पाटण तालुक्यातील तारळे विभागात येणार्या दुसाळे गावचे रहिवाशी सचिन जाधव हे 111 इंजिनियर रेजिमेंटमध्ये नायक होते. सध्या ते लेह-लडाख सीमेवर कार्यरत होते. बुधवारी (दि. 16) कर्तव्य बजावताना त्यांना वीर मरण आले. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने आज रात्री 10 वाजता पुणे येथे येणार आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर दुसाळे या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - 'आधी मराठा आरक्षण नंतर पोलीस भरती; अन्यथा परिणामांना सामोरे जा'
हुतात्मा जवान सचिन जाधव यांचे वडील संभाजी जाधव सुभेदार मेजर पदावरून निवृत्त झाले आहेत, तर त्यांचा भाऊही सैन्य दलात आहे. जवानाला वीरमरण आल्याची वार्ता समजताच संपूर्ण तारळे परिसर तसेच दुसाळे, वजरोशी या गावांवर शोककळा पसरली.