ETV Bharat / state

सातारा : पुसेगावच्या सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना कोरोना लागण - सातारा कोरोना बातमी

पुसेगावच्या सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थीनींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून त्यांची तब्येत ठणठणीत आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका चौगुले यांनी दिली.

six-students-of-sevagiri-vidyalaya-tested-corona-positive-in-pusegaon
सातारा : पुसेगावच्या सेवागिरी विद्यालयातील 6 विद्यार्थ्यांना कोरोना लागण
author img

By

Published : Feb 21, 2021, 3:23 AM IST

सातारा - एका कुटुंबातील कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संसर्गामुळे पुसेगावच्या सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आली आहे. शाळा पुन्हा कधी सुरू करायची याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया

एका विद्यार्थीनीचे आजोबा पाॅझिटीव्ह -

या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीचे आजोबा पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यादरम्यान या विद्यार्थीनीला बाधा झाल्याचा अहवाल आला. शाळा सुरु झाल्यापासून शासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रसार रोखण्यासाठी या विद्यालयातर्फे दररोज सर्वप्रकारची दक्षता घेतली जात आहे. तरीही घरातील व्यक्तीद्वारे प्रसार झालेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले या शाळेतील अन्य पाच विद्यार्थी बाधीत असल्याचे आढळून आले. दरम्यान, विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने शाळा बंद करण्यात आली असल्याचे या शाळेच्या मुख्याध्यापिका चौगुले यांनी सांगितले. या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून त्यांची तब्येत ठणठणीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

शाळेतर्फे विविध उपाययोजना -

दरम्यान, शाळेतर्फे दररोज विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्सिजन लेव्हल, पल्सेस, सॅनिटायजेशन, मास्क व एका बाकावर एक विद्यार्थी, या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत होती. सर्व शिक्षकांचे कोरोना तपासणीचे आरटीपीसीआर अहवाल निगेटीव्ह आहेत, त्यानंतरच त्यांना शाळेत रुजू करण्यात आले होते. कोरोना प्रसार होऊ नये, यासाठी या शाळेने सतर्कता बाळगली होती.

पालकांनी घाबरु नये -

शाळेतील एकही शिक्षक अथवा शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना बाधित नाही. कोरोनाबाधीत विद्यार्थी संख्येबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता पालकांनी स्वतःची व आपल्या मुलांची अधिक काळजी घ्यावी. विशेषतः विद्यार्थ्याला ताप, थंडी, सर्दी, खोकला यापैकी काहीही लक्षण आढळून आल्यास, अशा विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत न पाठवता त्यांच्यावर त्वरीत वैद्यकीय उपचार करावेत. दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत शाळा केव्हा सुरु करावयाची याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका चौगुले यांनी दिली.

हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट, तब्बल 727 कोरोना पॉझिटीव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.