ETV Bharat / state

Leopard Tortured In Satara: सेल्फीच्या नादात आजारी बिबट्याचा तरुणांनी केला छळ - Leopard Tortured In Satara

अन्न-पाण्याविना अशक्त झालेला बिबट्या पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आला असताना सेल्फीच्या नादात तरुणांनी बिबट्याचा छळ केला. पाटण तालुक्यातील केरळ गावच्या शिवारात ही घटना घडली. आजारी बिबट्याला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. दरम्यान, बिबट्याच्या छळ प्रकरणी वन विभागाने एका तरुणास ताब्यात घेतले आहे.

Leopard Tortured In Satara
बिबट्याचा तरुणांनी केला छळ
author img

By

Published : Jun 3, 2023, 10:40 PM IST

आजारी बिबट्याचा असाही छळ

सातारा: पाटण तालुक्यातील केरळ गावात शनिवारी दुपारी अडीच वर्षे वयाचा मादी बिबट्या पाणी व अन्नाच्या शोधात आला. तो आजारी आणि अशक्त होता. तरुणांनी बिबट्याजवळ जाऊन सेल्फी काढले. अतिउत्साही तरुणाने बिबट्याला उचलण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तरुणांच्या हुल्लडबाजीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

बिबट्याला पुण्याला हलवले: ग्रामस्थांनी वनविभागाला खबर दिल्यानंतर पाटणचे वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत पोतदार, वनपाल वाय. एस. सावर्डेकर, वनसेवक संजय जाधव, आनंदा सकट, उदय गायकवाड घटनास्थळी आले. बिबट्याला जाळीच्या सहाय्याने पकडले. पाटण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बिबट्याला पुण्याला नेण्यात आले.

एक जण ताब्यात: सेल्फीसाठी बिबट्याचा छळ केल्याप्रकरणी वन विभागाने एकाला ताब्यात घेतले आहे. अशक्तपणामुळे बिबट्याची शारीरिक हालचाल मंदावली होती. त्याला चालताही येत नव्हते. अशा अवस्थेत बिबट्याचा पाठलाग करून, उचलून घेत तरुणांनी त्याचा छळ केल्याचे व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट झाले. याप्रकरणी वन विभाग गुन्हा दाखल करणार आहे.

वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले: पाटण तालुक्यात वन्य प्राण्यांचा गाववस्तीतील वावर आणि नागरिकांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात एका महिलेचा गवा रेड्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर गवा रेड्याने हल्ला केला होता. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू: भक्षाचा पाठलाग करताना विहीरीत पडून बिबटयाचा मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. शिकारीसाठी लोकवस्तीमध्ये आल्याने बिबटयांसह अन्य वन्यप्राण्यांना जीवाला मुकावे लागते. अशाप्रकारे वन्यप्राण्यांच्या मृत्यूंचे प्रमाण तालुक्यात वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

बिबट्या पाण्यावर तरंगताना आढळला: ढोक्रवली गावातील सुतारवाडी परिसरातील मनोहर राजाराम महाडीक यांच्या मालकीच्या विहीरीवर गुरूवारी सकाळी मोटर सुरू करण्यासाठी एक व्यक्ती गेला. तेव्हा त्याला एक बिबट्या पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबत त्यांनी सावर्डे येथील वनविभागाला कळवल्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेश्री किर, वनसंरक्षक रानबा बंबर्गेकर यानी घटनास्थळी जाऊन मृत बिबटयाला ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.