ETV Bharat / state

Karad Dakshin Assembly Constituency : कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाची चाचपणी, कराड दक्षिणमध्ये कोण लागणार गळाला ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने ( CM Eknath shinde ) आगामी विधानसभा निवडणूक तयारीच्या अनुषंगाने आतापासूनच कराड दक्षिण विधानसभा मतदार ( Karad Dakshin Assembly Constituency )संघात चाचपणीला सुरूवात केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाच्या गळाला कोण लागणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Karad Dakshin Assembly Constituency
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात चाचपणीला सुरूवात
author img

By

Published : Oct 12, 2022, 5:46 PM IST

सातारा - सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath shinde ) गटाने आगामी विधानसभा निवडणूक तयारीच्या अनुषंगाने आतापासूनच चाचपणीला सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात ( Karad Dakshin Assembly Constituency ) शिंदे गटाकडून मातब्बर उमेदवार गळाला लावण्याची व्यूव्हरचना सुरू झाली आहे. उमेदवाराचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. मात्र, शिंदे गटाच्या हालचाली गतिमान झाल्याचे पाहायला मिळत असून शिंदे गटाच्या गळाला कोण लागणार, याची उत्सुकता वाढली आहे.

मतदार संघ भाजपकडे - सेना-भाजप युतीमध्ये कराड दक्षिण मतदार संघ शिवसेनेकडे होता. 1995 मध्ये शिवसेनेचे तत्कालिन कराड तालुकाप्रमुख दिवंगत अशोक भावके यांनी दिवंगत विलासकाका उंडाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यानंतर मुंबईस्थित कमलाकर सुभेदार यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. विधानसभा मतदार संघांची पुनर्रचना झाल्यानंतर 2009 पासून शिवसेना-भाजप युतीमध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ भाजपकडे गेला आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी 2014 आणि 2019 ची निवडणूक कमळ चिन्हावर लढविली. मात्र, दोन्ही वेळा त्यांना अपयश आले. त्यापुर्वी (२००९ मध्ये) राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांनी कराड उत्तरमधून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. मात्र, राष्ट्रवादीचे बंडखोर बाळासाहेब पाटील यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला होता.

भाजपचे अतुल भोसले इच्छूक - भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी 2014 आणि 2019 ची निवडणूक कमळ चिन्हावर लढविली. मात्र, दोन्ही वेळा त्यांना अपयश आले. त्यापुर्वी (२००९ मध्ये) राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांनी कराड उत्तरमधून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. मात्र, राष्ट्रवादीचे बंडखोर बाळासाहेब पाटील यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला होता. आता चौथ्यांदा ते कराड दक्षिणमधून भाजपतर्फे इच्छूक आहेत. मात्र, बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये शिंदे गट कराड दक्षिण मतदार संघावर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. तसेच दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला भाजप पुन्हा उमेदवारी देत नाही, असे सांगितले जात आहे. अतुल भोसले यांचा सलग तीनवेळा पराभव झाला आहे. त्यामुळे शिंदे गट कराड दक्षिणवर दावा करणार असल्याचे समजते. त्यासाठी कराड दक्षिणमध्ये चाचपणी देखील सुरू केली असून कराड नगरपालिका निवडणुकीत त्याचे पडसाद पाहायला मिळू शकतात.

कराडमध्ये मुख्यमंत्र्यांचा सत्कार - सातार्‍याचे भुमीपूत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कराडमध्ये जंगी सत्कार आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. कराड नगरपालिकेच्या राजकारणातील एक गट त्यासाठी जोरदार तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यात एक बैठकही झाली आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सत्काराची तारीख निश्चित होणार असून या कार्यक्रमात शिंदे गटाचे शक्तीप्रदर्शनही पाहायला मिळणार आहे. शिंदे समर्थक गट कराड नगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक स्थानिक आघाडीबरोबर लढविणार की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार, हे काही दिवसांत स्पष्ट होईल. परंतु, कराडमधील शिंदे गटाची विधानसभा निवडणुकीतील भूमिका महत्वाची असणार आहे. तथापि, कराड दक्षिणमध्ये शिंदे गटाचा उमेदवार कोण असणार, यावर देखील बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत. शिंदे गटाच्या मनात जो कोणी संभाव्य उमेदवार आहे, तो शिंदे गटाची ऑफर स्वीकारणार का, या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर कराड दक्षिणचे राजकीय गणित ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.