सातारा - आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर नेते यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन आहे. यासाठी शरद पवार कराड येथे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते.
हेही वाचा- शरद पवार आपल्यासोबत ठामपणे, चिंता करण्याचे कारण नाही - उद्धव ठाकरे
पवारांनी या वेळी स्मृतीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. यानंतर पवार हे चव्हान प्रतिष्ठानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे. कराड येथील कार्यक्रम उरकून पवार हे मुंबईकडे रवाना होणार आहेत.