ETV Bharat / state

‘हे वागणं बरं नव्हं’, साताऱ्यात पवारांचा उदयनराजेंना टोला

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.

शरद पवार
author img

By

Published : Sep 22, 2019, 9:39 PM IST

सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीच्या दरबारात अपमान झाला. त्यानंतर ते दरबारातून निघून गेले आणि आता? मी एवढचं म्हणेन हे वागणं बरं नव्हे, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला. उदयनराजेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर पवार पहिल्यांदाच साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी उदयनराजेंवर भाष्य केले.

मोठ्या कारखानदारांचे सरकारने 85 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि महापुराच्या संकटाकडे बघायला सरकार तयार नाही. दुसरीकडे किल्ले सरकारने विकायला काढले. त्या ठिकाणी छम छम वाजवण्याची सरकार काम करत आहे. ज्या किल्ल्यांवर स्वाभिमानाचा इतिहास घडला तिथे हॉटेल आणि बार उभे करण्याचे नियोजन हे सरकार करत आहे, असे पवार म्हणाले. पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना दिल्लीचे आमंत्रण दिले. दरबारात सन्मान होईल, असा शब्द दिला. पण, महाराज दिल्लीत गेल्यानंतर त्यांना दरबारात मागे बसवले. महाराज तेथून बाहेर पडले. त्यानंतर त्यांना कैद करण्यात आले. मात्र, राजे त्यातूनही सुटले आणि महाराष्ट्रात परत येऊन त्यांनी इतिहास घडवला. त्यामुळे ‘हे वागणं बरं नव्हं.’ असे म्हणत पवारांनी उदयनराजेंवर टीका केली.

हेही वाचा - महाराजांच्या तलवारी चमकल्या तिथे राज्य सरकार छमछमचा आवाज करणार - शरद पवार

मी अजून म्हातारा झालो नाही

मला अनेक जण 80 वर्षांचा म्हातारा तर कोणी वयस्कर झालेत, असे म्हणतात. कुणी सांगितले, मी म्हातारा झालो. आज देखील मी 20 तास काम करू शकतो. मी महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ देणार नाही. 'काळ्या आईची राखण करणाऱ्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. अशा या सरकारला पुन्हा सत्ता मिळू देणार नाही, असे पवार म्हणाले.

हेही वाचा - समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या भाजपला 'चले जाव' म्हणायची वेळ - शरद पवार

मी चुकलो, जयंत पाटलांचा सल्ला ऐकला नाही

उदयनराजेंचे नाव न घेता जयंत पाटील यांचा सल्ला मी ऐकला नाही, अशी कबुली पवारांनी दिली. ते म्हणाले, पाटील यांचा सल्ला न ऐकण्याचे कारण एवढेच होते, की आम्हाला छत्रपतींच्या गादीचा अभिमान आहे. ती गादी शिवबाची आहे. त्यांनी ते करावे पण, मी चुकलो. मला आता त्यावर फारसे बोलायचे नाही. कारण, वेगळा मार्ग स्वीकारायचा हा त्यांना लोकशाहीने अधिकार दिला आहे.

Intro:सातारा मोठ्या उद्योग क्षेत्रात 85हजार कोटी रुपयांचे कर्ज मोठं मोठ्या कारखानदारांचे माफ केलं गेलं आहे. मात्र दुष्काळी परिस्थिती आणि महापुराच्या संकटाकडे बघायला सरकार तयार नाही. दुसरीकडं किल्ले सरकारने विकाय काढले त्या ठिकाणी छम छम वाजवण्याची सरकार काम करत आहे. ज्या किल्ल्यांवर स्वाभिमानाचा इतिहास घडला तिथं हॉटेल आणि बार उभं करण्याचं नियोजन हे सरकार करत आहे.

Body:पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना दिल्लीचे आमंत्रण दिले होते. दरबारात सन्मान होईल, असा शब्द त्यांनी दिला होता. पण, महाराज दिल्लीत गेल्यानंतर दरबारात त्यांना मागे बसवले. महाराज तेथून बाहेर पडले राजे त्यातूनही राजे सुटले आणि महाराष्ट्रात परत येऊन त्यांनी इतिहास घडवला होता त्यावर ‘हे वागणं बरं नव्हं.’ असं म्हणत उदयनराजे भोसले यांना टोला लगावला.

मला अनेक जण ८० वर्षांचा महातार म्हणत्यात. कोणी वयस्कर झालेत म्हणतात. कुणी सांगितलं, मी महातारा झालो. आज देखील मी २० तास काम करू शकतो पण महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ देणार नाही.’काळ्या आईची राखण करणाऱ्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. अश्या या सरकारला पुन्हा सत्ता देणार नाही

जयंत पाटील यांनी भाषणात सांगितले की मी आधीच सांगत होतो त्यावेळेस माझा आईकल गेलं नाही त्यावेळी मी लहान होतो यावरती पवार म्हणाले मी जयंत चा सल्ला मी ऐकला नाही, अशी कबुली दिली ते म्हणाले, ‘जयंत पाटील यांचा सल्ला न ऐकण्याचं कारण एवढच होतं की, तुम्हाला आम्हाला या गादीचा अभिमान आहे. ती गादी शिवबाची आहे. त्यांनी ते करावं पण, मी चुकलो. मला आता त्यावर फारसं बोलायचं नाही. कारण, वेगळा मार्ग  स्वीकारायचा हा त्यांना लोकशाहीने अधिकार दिला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.