ETV Bharat / state

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : बिहार पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन - गृहराज्यमंत्री

अभिनेता सुशातसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. इतर कोणी त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी बिहार पोलिसांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली.

author img

By

Published : Jul 31, 2020, 3:07 PM IST

Shambhuraj Desai
शंभूराज देसाई

सातारा - अभिनेता सुशातसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना बिहार पोलिसांनी विनापरवाना मुंबईत येऊन प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे. मुंबई पोलीस सुरुवातीपासून या प्रकरणाचा तपास करत असताना वेगळा तपास करणे योग्य नाही, असे मत गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. साताऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबईत येऊन बिहार पोलिसांकडून प्रोटोकाॅलचे उल्लंघन

सुशांतच्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. प्राथमिक तपासात ज्या बाबी समोर आल्या त्याचा खोलवर तपास पोलीस निश्चितपणे करत आहेत. आवश्यक लोकांचे जबाबही नोंदवून घेतले जात आहेत. येथून पुढेही आणखी काही बाबी समोर आल्या, तर त्यादृष्टीने तपास केला जाईल. दरम्यान , बिहारमध्येही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास करताना बिहार पोलीस प्रोटोकॉलचे उल्लंघन करत मुंबईत दाखल झाले. हा प्रकार नियमांना धरून नाही, असे शंभूराज देसाई म्हणाले.

बिहार पोलिसांनी महाराष्ट्रात येताना राज्य सरकार आणि राज्य पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नाही. मुंबई पोलीस गांभिर्याने या गुन्ह्यात तपास करत असताना इतर कोणी त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी बिहार पोलिसांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.