ETV Bharat / state

कराडमधील सात जणांची टोळी तीन जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार

उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, मारारीसह अनेक गंभीर गुन्हे नोंद असणार्‍या सात जणांच्या टोळीला सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

author img

By

Published : Apr 4, 2021, 4:48 PM IST

कराड (सातारा) - उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे नोंद असणार्‍या सात जणांच्या टोळीला सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतून वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता.

विशाल अशोक दुटाळ, किरण आनंदराव पवार, अविनाश राजेंद्र पवार, आशितोष गणेश संकपाळ, पवन उर्फ प्रवीण शामराव साळुंखे, राजेंद्र मसुगडे, कैलास तात्याबा चव्हाण, अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना संपूर्ण सातारा जिल्हा तसेच सागंली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याचा आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिला आहे.

पोलीस अधीक्षक बन्सल यांनी सातारच्या पोलीस अधीक्षकपदाचा भार स्वीकारल्यापासून आतापर्यंत 10 प्रस्तावांमधील तब्बल 41 जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात वचक बसला आहे. हद्दपार प्राधिकरणापुढे अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, किशोर धुमाळ, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पुरावे सादर केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.