सातारा - आपत्ती व्यवस्थापन या कायद्यांतर्गत विविध प्रकारच्या आस्थापना सुरु करण्यास बंदी घातली आहे. मात्र, सातारा शहर आणि परिसरात काही ठिकाणी त्याचे उल्लंघन होत असल्याने सातारा शहर पोलिसांनी ४ तरुण आणि ३ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहे.
सातारा येथील गोडोली परिसरातील मोरे विहरीजवळ काही तरूण मोकळ्या मैदानावर खेळत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असता, प्रसाद निकम, प्रितम बनकर, ओंकार सांळुखे, प्रथमेश भागवत हे दुचाकी पार्क करून मैदानात खेळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सातारा शहर पोलीस ठण्यातील कॉन्स्टेबल भरत लावंड यांनी चौंघावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे करत आहेत. दुसऱ्या घटनेत सातारा बस स्थानकामागे रूबी क्लिनिक जवळ पारंगे चौकात आरमान वडा पाव सेंटर सुरू होते. पोलिसांनी वडापाव सेंटरचा मालक नियाज दस्तगीर शिकलगार (रा. वाडे फाटा,सातारा) याच्याविरोधात कारवाई केली.
शाहूपुरी पोलिसांची कारवाई
शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पंचपाळी कमानी हौद येथे सुरू असलेल्या निलम मसाला व ड्रायफ्रुट्स या दुकानाचे मालक राहुल बाळासो पवार (रा.यवतेश्वर,ता.सातारा) तसेच याच परिसरातील एशियन पेंट्स या दुकानाचे मालक संतोष जाधव (रा.अंबवडे,ता.सातारा) या दोघांवर दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - खुशखबर.. महाराष्ट्रातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत